गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थिनींकडून वृक्षाला राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थिनींकडून वृक्षाला राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शाळा परिसरातील वृक्षाला राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.
शाळेतील विद्यार्थिनींनी मोठ्या स्वरूपाची राखी तयार केली होती. वृक्षाला समारंभपूर्वक राखी बांधण्यात आली.
शाळेच्या विद्यार्थिनींनी राख्या निर्मिती कार्यशाळेत बनविलेल्या ५००० राख्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी पाठविल्या आहेत. तसेच रक्षाबंधनादिवशी शाळा परिसरातील वृक्षाला राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, डी.जी.लकमले, जी डी.ठाकूर, बी.ए.डावरे, एस. एस. नाईक, आर.पी.गव्हाणकर, पी.पी.भंडारी, एस.एम.साळवी, युवराज शिगावकर, श्रीमती आर.आर.बहादुरे, बी.के.इंगळे, सौ. एल.आर.पाळेकर, सौ. सुजाता पाटील, श्रीमती मेघा चव्हाण पाटील, सौ. मंगल कांबळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
