नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्प निदेशक, चित्रकार विवेक चंदालिया यांना यंदाचा ‘नॅशनल टीचर्स अवॉर्ड’ : ५ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्प निदेशक, चित्रकार विवेक चंदालिया यांना यंदाचा ‘नॅशनल टीचर्स अवॉर्ड’ : ५ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्प निदेशक, चित्रकार विवेक चंदालिया यांना यंदाचा ‘नॅशनल टीचर्स अवॉर्ड’ : ५ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
सन २०२४ सालाकरिता देण्यात येणाऱ्या आय.टी.आय निदेशकांसाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून यात कोल्हापूरचे चित्रकार आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्प निदेशक श्री. विवेक चंदालिया यांना यंदाचा ‘नॅशनल टीचर्स अवॉर्ड’ जाहीर झाला आहे.
दरवर्षी कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत घेण्यात येणारे व्यावसायिक प्रशिक्षण आणि उद्योजकता विकासातील उत्कृष्टतेसाठी म्हणजे दीर्घकालीन आणि अल्प-मुदतीच्या प्रशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक, कौशल्य प्रशिक्षक आणि मास्टर ट्रेनर तसेच उद्योजकता विकासात, ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे . त्यांच्या गुणवत्तापूर्ण कामगिरीचे परिणाम, इतरांना अनुकरण करण्यासाठी बेंचमार्क सेट करणाऱ्या विशिष्ट व्यक्तिंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देणाचा उद्देश असतो.
सन २०२४ सालाकरिता देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारात कोल्हापूरचे चित्रकार आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्प निदेशक श्री. विवेक चंदालिया यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर २०२४ रोजी विज्ञान भवन,नवी दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. आणि ६ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्ली येथे पुरस्कार्त्यांसोबत संवाद साधणार आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031