जगभरातील ज्ञान मराठी भाषेत निर्माण करण्याचे सामर्थ्य प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यात निर्माण व्हावे : श्री.अविनाश धर्माधिकारी
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
जगभरातील ज्ञान मराठी भाषेत निर्माण करण्याचे सामर्थ्य प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यात निर्माण व्हावे : श्री.अविनाश धर्माधिकारी
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
जगभरातील ज्ञान मराठी भाषेमध्ये निर्माण करण्याचे सामर्थ्य प्रायव्हेट हायस्कूल या मराठी शाळेतील विद्यार्थ्यात निर्माण व्हावे, असे उदगार माजी सनदी अधिकारी, चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक, प्रसिद्ध वक्ते श्री.अविनाश धर्माधिकारी यांनी काढले. शिक्षकांना विद्यार्थीप्रिय शिक्षक हाच खरा पुरस्कार असल्याचेही सांगितले.
दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी आणि माजी विद्यार्थी संघ यांचा संयुक्त वर्धापन दिनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.अविनाश धर्माधिकारी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघाचे विद्यमान अध्यक्ष श्री.भूपेंद्र शहा होते.
श्री.अविनाश धर्माधिकारी यांनी त्यागी, तपस्वी, निस्पृह व्यक्तिमत्वांमुळेच भारतीय संस्कृतीची बीजे रोवली गेली आहेत. असे सांगून भारत मातेची सेवा करणारे कर्तबगार विद्यार्थी प्रायव्हेट हायस्कूलमध्ये घडावेत असा आशावाद व्यक्त केला .
याप्रसंगी शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल संस्थेच्या विविध शाखांमधील शिक्षकांना ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेच्या नियामक मंडळाचे चेअरमन श्री. उदय सांगवडेकर, व्हा. चेअरमन डॉ. सुनील कुबेर, नियामक मंडळातील सर्व मान्यवर सदस्य,संस्थेच्या कार्यवाह सौ. एस.आर.डिंगणकर , कोषाध्यक्ष श्री जी एस जांभळीकर संस्थेच्या सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षकेतर, विद्यार्थी , पालक, हितचिंतक उपस्थित होते. आभार कोषाध्यक्ष श्री.जी.एस.जांभळीकर यांनी मानले. सूत्रसंचालन सौ.एस.व्ही.हिरेमठ यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
