नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , वन्यजीव संरक्षण व संवर्धन तसेच निसर्गपयोगी उपक्रमांच्या निशुल्क कार्यशाळा घेण्यासाठी संपर्काचे टिम वर्ल्ड फॉर नेचरकडून आवाहन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

वन्यजीव संरक्षण व संवर्धन तसेच निसर्गपयोगी उपक्रमांच्या निशुल्क कार्यशाळा घेण्यासाठी संपर्काचे टिम वर्ल्ड फॉर नेचरकडून आवाहन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

वन्यजीव संरक्षण व संवर्धन तसेच निसर्गपयोगी उपक्रमांच्या निशुल्क कार्यशाळा घेण्यासाठी संपर्काचे टिम वर्ल्ड फॉर नेचरकडून आवाहन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
निसर्गाची कास धरत, वन्यजीवांची सेवा करत, सामाजिक कार्याचे भान जपत आमची “वर्ल्ड फॉर नेचर” संस्था ही गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर पर्यावरण शिक्षण, निसर्ग संवर्धन, वन्यजीव जनजागृती, वन्यजीव संशोधन, निसर्गोपयोगी सामाजिक उपक्रम यावर सातत्याने काम करत आहे.
    आज शालेय विद्यार्थ्यांना व जनसामान्यांना निसर्ग, वन्यजीव व जैवविविधतेची ओळख व्हावी व त्यांच्या मनात निसर्गाविषयी आपुलकी निर्माण व्हावी हाच आमचा मुख्य उद्देश आहे जेणेकरून येणारी पिढी ही निसर्ग, पर्यावरण व जैवविविधतेबद्दल जागरूक होईल, सजग होईल व त्यासाठी कार्य करेल.
    वर्ल्ड फॉर नेचरने सुरू केलेली ही चळवळ व विविध उपक्रम महाराष्ट्राच्या विविध भागात पोहचवून निसर्ग संवर्धनासाठी व पर्यावरण संरक्षणासाठी एक सजग पिढी तयार करण्यासाठी आम्हाला आपली साथ हवी आहे. एकमेकांच्या सहकार्याने व सहाय्यानेच आपण हा निसर्ग संवर्धनाचा, पर्यावरण संरक्षणाचा रथ अखंडितपणे ओढता येईल….. आपल्यासाठी….आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी…..हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही वर्ल्ड फॉर नेचर संस्था पूर्ण महाराष्ट्रात वन्यजीव संरक्षण व संवर्धन तसेच अनेक निसर्गपयोगी उपक्रमांच्या कार्यशाळा, Awareness Workshops पूर्णपणे निशुल्क घेत आहेत.
या कार्यशाळा आयोजित करण्यासाठी मो. नं.9503008962 / 9850339373 /9404009187 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031