तालुकास्तरीय मैदानी स्पर्धत आबिटकर ज्युनिअर कॉलेज, कडगावच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धत आबिटकर ज्युनिअर कॉलेज, कडगावच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
श्री. मौनी विद्यापीठाच्या क्रिडांगणावर झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धत श्री.आनंदराव आबिटकर ज्युनिअर कॉलेज, कडगावच्या विद्यार्थ्यानी विविध स्पर्धा प्रकारात सहभाग नोंदवून उतुंग यश संपादन केले. या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
महाविद्यालयातील यशस्वी विद्यार्थी असे – १) रोहित सुतार -थाळीफेक- प्रथम क्रमांक, गोळाफेक – द्वितीय क्रमांक
२)मयूर तेजम-800 मीटर धावणे – प्रथम क्रमांक,३) बाबासाहेब कांबळे-
100 मीटर अडथळा धावणे- प्रथम क्रमांक, 5000 मीटर चालणे – प्रथम क्रमांक ४)शुभम मांगले-400 मीटर अडथळा धावणे – प्रथम क्रमांक, उंच उडी – तृतीय क्रमांक
5) संग्राम पाटील 200 मीटर धावणे – द्वितीय क्रमांक, 100 मीटर रिले – द्वितीय क्रमांक 6)पार्थ तेजम-100 मीटर अडथळा धावणे – द्वितीय क्रमांक, 5000 मीटर चालणे – द्वितीय क्रमांक 7)शिवराज मांगले-400 मीटर अडथळा धावणे – द्वितीय क्रमांक 8)प्रथमेश देसाई- हातोडा फेक – द्वितीय क्रमांक, भाला फेक – तृतीय क्रमांक
9)रविना सावंत-गोळा फेक – तृतीय क्रमांक. या सर्वांची जिल्हास्तरीय स्पर्धासाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी मुलांचे कौतुक व अभिनंदन केले. कॉलेजचे प्राचार्य गुरुप्रसाद शेणवी यांचे प्रोत्साहन तर क्रीडा विभागप्रमुख प्रा.रोहित गुरव व प्रा. वैष्णव देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
