‘सावित्री केरु गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार’ कार्तिकी लेंबरकर हिने पटकावला
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
‘सावित्री केरु गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार’ कार्तिकी लेंबरकर हिने पटकावला
माध्यमिक विद्यालय जुवाठी येथील उपक्रम
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
राजापूर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, जुवाठी (ता.राजापूर) येथील यावर्षीचा ‘सावित्री केरु गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार’ कार्तिकी संतोष लेंबरकर हिला शाळेचे मुख्याध्यापक वासुदेव गोवळकर याच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
माध्यमिक विद्यालय जुवाठी मध्ये भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला यावेळी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुस्तक प्रदर्शन मांडण्यात आले होते यावेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, एक पुस्तक व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी उत्तेजनार्थ म्हणून अनुष्का अनिल धुरी, श्रुतिका विलास घाणेकर, पूर्वा राजेंद्र मयेकर, सतेज संतोष मयेकर व स्वरुप संदीप घेवडे याना एक ग्रंथ भेट देवून गौरविण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक रामदास सावंत, दीपक सूर्यवंशी, बी. के गोंडाळ शालेय मुख्यमंत्री पियुष अनुमाने व विद्यार्थी उपस्थित होते.
या विद्यालयातील सहायक शिक्षक बी. के. गोंडाळ याच्या सौजन्याने हा पुरस्कार दिला जातो. हे पुरस्काराचे सहावे वर्ष आहे.
या शाळेत शिक्षक बी. के. गोंडाळ याच्या मार्गदर्शनाने इयत्ता आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना दर शनिवारी शालेय ग्रंथालयातून एक पुस्तक दिले जाते विद्यार्थी ते पुस्तक वाचतात व पुस्तकाचे नाव, लेखक, आवडलेली गोष्ट, आवडलेले पात्र, ती गोष्ट – पात्र का आवडले, पुस्तकातून मिळालेला मूल्यविचार, ते पुस्तक का आवडले? या बाबत आपले मत. या मुद्यावर परीक्षण करतात व अशी परीक्षण केलेली वही पुरस्कार मूल्यमापनसाठी दिली जाते.
अशा विद्यार्थ्यांतून अठरा पुस्तकाचे परीक्षण केलेल्या कार्तिकी लेंबरकर हिच्या वहीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space