नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पेठवडगाव विभागातील १७ माध्यमिक शाळा व एका वाचनालयास ४०० पेक्षा अधिक दर्जेदार पुस्तके भेट देणार – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

पेठवडगाव विभागातील १७ माध्यमिक शाळा व एका वाचनालयास ४०० पेक्षा अधिक दर्जेदार पुस्तके भेट देणार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पेठवडगाव विभागातील १७ माध्यमिक शाळा व एका वाचनालयास ४०० पेक्षा अधिक दर्जेदार पुस्तके भेट देणार

ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांच्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत वाचन प्रेरणा दिनाच्या पार्श्वभूमीवर बहुमोल ग्रंथभेट

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पेठवडगाव
हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव विभागातील १७ माध्यमिक शाळा व एका सार्वजनिक वाचनालयास ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार जीवन साळोखे हे आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत ४०० वाचनीय, दर्जेदार पुस्तके देणार आहेत. पेठवडगाव येथील श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सेमिनार हाॅलमध्ये हा ग्रंथदान समारंभ सोमवार २१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वा. उत्साहात संपन्न होणार आहे.
केडीसीसी बँकेचे संचालक आणि बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबपचे अध्यक्ष श्री. विजयसिंह माने यांचे अध्यक्षतेखाली आणि माजी जि. प. सदस्या सौ.मनिषा माने यांचे प्रमुख उपस्थितीत हा ग्रंथदान समारंभ होणार आहे. यावेळी प्राचार्य जीवन साळोखे हे “पेठ वडगाव विभागातील” माध्यमिक शाळांना प्रत्येकी दर्जेदार , वाचनीय पंधरा पुस्तकांचा संच, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या गाजलेल्या पाच कादंबऱ्यांचा एक खंड, ग्रंथालय शास्त्राचे जनक डाॅ.एस.आर.रंगनाथन यांची लॅमिनेटेड प्रतिमा आणि २०२४ चा साप्ताहिक साधनाचा दिवाळी अंक हे एकत्रित भेट देणार आहेत.
गेली एकोणीस वर्षे सातत्याने “एकहाती ग्रंथदान उपक्रम” राबवणारे प्राचार्य जीवन साळोखे यांनी आजवर जिल्ह्यातील शालेय ग्रंथालये व सार्वजनिक वाचनालयांना सुमारे पंधरा हजार पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. २०२४ या वर्षात त्यांचा दोन हजार पुस्तके देण्याचा संकल्प आहे. तसेच आण्णाभाऊ साठेंच्या पाच-पाच कादंबर्‍यांचे दोनशेहून अधिक खंड ते देणार आहेत.
समृद्ध शालेय ग्रंथालय अभियान आणि वाचन प्रोत्साहनासाठी ग्रंथदान उपक्रम प्राचार्य जीवन साळोखे हे प्रत्यक्ष कृतीतून एकहाती राबवत आहेत. जुलै- २०२४ मध्ये त्यांनी रुकडी परिसरातील पंचवीस हायस्कूल्स व वाचनालयांना पाचशेहून अधिक ग्रंथभेट दिली आहे.
“वाचन प्रेरणा दिन सप्ताहात ” प्रत्यक्ष ग्रंथभेट देवून ते हा विशेष दिन साजरा करत आहेत. विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग अधिक वाचते होण्यासाठी हा उपक्रम यापुढेही गतीने राबवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728