गडकिल्ले प्रतिकृती साकारणाऱ्या चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य भेट : अवधुत पाटील यांचा उपक्रम
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
गडकिल्ले प्रतिकृती साकारणाऱ्या चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य भेट : अवधुत पाटील यांचा उपक्रम
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
भुदरगड तालुक्यातील खानापूर येथे पर्यावरणमित्र अवधुत पाटील व कुटुंबीयांकडून दिवाळी सुट्टीदरम्यान अवकाळी पाऊस झेलत निसर्गाच्या प्रकोपावर मात करीत साकारलेल्या गडकोट किल्यांच्या प्रतिकृती बांधणी सहभागाबद्दल चिमुकल्या मुलांना प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.
दिवाळीच्या सुट्टीत गडकोट किल्ल्यांची प्रतिकृती साकारत शिवकालीन इतिहास संस्कृती जपताना गडकिल्ल्यांच्या जतन व संवर्धनाचा संदेश देण्याचे महत्वपूर्ण कार्य चिमुकल्या मुलांच्या हातून घडत असते. आजच्या धावपळीच्या युगात छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास मुलांच्या रोमारोमात उतरवण्याबरोबरच गडकिल्ल्यांवरील नितांत श्रद्धा अबाधित ठेवण्यासाठी, इतिहास जागता ठेवणाऱ्या मुलांचा आत्मविश्वास, उत्साह द्विगुणित करण्यास्तव वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.
उपक्रमाची सुरुवात सचिन पाटील यांनी शिवप्रतिमा पूजनाने व संतोष पाटील यांनी पुष्पहार घालून केली. छत्रपती शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेल्या रायगडावरील मातीचे पूजन अवधुत पाटील, क्षितिज पाटील यांनी केले. मिथाली पाटील हिने शिवगारद म्हंटले. शिवप्रश्न मंजुषा उपक्रमात मुलांनी सहभाग घेत शिवकालीन इतिहास जागता ठेवला. प्रसंगी प्रतापगडाची हुबेहूब प्रतिकृती साकारणाऱ्या अथर्व पाटील, केदार पाटील यांचे सादरीकरण, माहितीचे विशेष कौतुक करण्यात आले. गडकिल्ले प्रतिकृती साकारणाऱ्या गावातील सर्व मुलांना सहभागाबद्दल वह्या व पेन भेट देण्यात आले. जान्हवी पाटील हिच्या शिवप्रेरणा मंत्राने उपक्रमाची सांगता झाली.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space