ग्रंथदानातून ग्रंथपालांचा यथोचित गौरव : इचलकरंजीतील आंतरभारती हायस्कूलमध्ये पार पडला आगळा वेगळा सोहळा
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
ग्रंथदानातून ग्रंथपालांचा यथोचित गौरव :
इचलकरंजीतील आंतरभारती हायस्कूलमध्ये पार पडला आगळा वेगळा सोहळा
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, इचलकरंजी
येथील आंतरभारती शिक्षण मंडळ, संचलित आंतरभारती हायस्कूलचे ग्रंथपाल आर. जे. पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त झालेल्या सत्कार समारंभात ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी ग्रंथदान करून औचित्य साधले.
आंतरभारती हायस्कूल, इचलकरंजीचे ग्रंथपाल आर.डी.पाटील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार प्राचार्य जीवन साळोखे (मुरगूड) यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. त्यावेळी आपल्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत आंतरभारती हायस्कूल, साने गुरूजी विद्यामंदिर, इचलकरंजी आणि माध्यमिक विद्यालय सावर्डे (ता.करवीर) अशा संस्थेच्या तीन माध्यमिक शाळांना त्यांनी प्रत्येकी २० वाचनीय पुस्तकांचा संच, ग्रंथालय शास्त्राचे जनक डाॅ.एस.आर.रंगनाथन यांचा फोटो तसेच सत्कारमूर्ती ग्रंथपाल श्री.पाटील, श्रीमती सुनंदा भागवत यांना ग्रंथसंच व डॉ. रंगनाथन यांचा फोटो भेट देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. सत्कारमूर्ती श्री. पाटील यांनीही आंतरभारती हायस्कूलला ग्रंथभेट देवून कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.शामराव नकाते, सेक्रेटरी श्री.फाटक, उपाध्यक्ष श्री. जगदाळे, माजी मुख्याध्यापक सर्वश्री सुनंदा भागवत, एम डी पाटील, एस एन पाटील तसेच मुख्याध्यापिका सौ. वर्षा फाटक, सौ. शिंदे, ए बी पाटील इ. सह संस्थेचे सर्व आजीमाजी शिक्षक-शिक्षकेतर उपस्थित होते.
यावेळी प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. वर्षा फाटक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी ग्रंथपाल आर डी पाटील यांचा यथोचित गौरव करून वाचनसंस्कृती, वाचन, ग्रंथप्रसार, ग्रंथदान यांचे सध्याच्या काळातील वाढते महत्त्व सविस्तर विशद केले. आभार डी एम देसाई यांनी तर सूत्रसंचालन ए के शेंडगे यांनी केले.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space