प्रायव्हेट इंग्लिश स्कूल येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
प्रायव्हेट इंग्लिश स्कूल येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या ॲड.पी.आर. मुंडरगी प्रायव्हेट इंग्लिश स्कूल, कोल्हापूर येथे वैभवीलक्ष्मी ब्लड बँक यांचे सहकार्याने प्रशालेत आयोजित रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले.
या शिबिरास पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद देवून ‘रक्तदान हेच जीवनदान आहे’ ही म्हण सार्थ ठरवून भरघोस प्रमाणात रक्तदान केले. आपल्या रक्तामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात ही भावना मनात ठेवून आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून रक्तदानास उत्तम प्रतिसाद दिला.
या रक्तदान शिबीरास संस्थेचे पदाधिकारी श्री. अरूण डोंगरे, श्री. मिलींद करमळकर तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. गिरीश जांभळीकर यांनी भेट देवून प्रोत्साहन दिले सदर कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.पी. नागुरकर व मुख्याध्यापिका. सौ.ए.एस. कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
