गारगोटी हायस्कूलचे समाजसेवा कॅम्प, छात्रसेना कॅम्प, वनभोजन आदी उपक्रम उत्साहात संपन्न
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
गारगोटी हायस्कूलचे समाजसेवा कॅम्प, छात्रसेना कॅम्प, वनभोजन आदी उपक्रम उत्साहात संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयातील माध्यमिक विभागाचे समाजसेवा कॅम्प, छात्रसेना कॅम्प, वनभोजन आदी उपक्रम उत्साहात संपन्न झाले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शाळेतील समाजसेवा कॅम्प श्री. तळेमाऊली मंदिर, खानापूर येथे संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली. छात्रसेना कॅम्प श्री.दत्त मंदिर, शेणगाव येथे पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली. तर इ.५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचे वनभोजन श्री. भैरवनाथ मंदिर, पुष्पनगर येथे संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबरोबरच मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमाचे संयोजन प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.एस. एस. नाईक, आर. पी. गव्हाणकर, युवराज शिगावकर, पी.पी.भंडारी, डी.जी.लकमले, जी डी. ठाकूर, बी. ए. डावरे, एस.एम. साळवी, श्रीमती आर.आर.बहादुरे, बी. के. इंगळे, सौ. एल.आर.पाळेकर, सौ. सुजाता पाटील, ऋषिकेश गव्हाणकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
