नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढेल : कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढेल : कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढेल : कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे

पिंपळगाव येथे ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, पिंपळगाव
वैज्ञानिक संशोधनामुळे नवनवीन तंत्रज्ञान पुढे येत आहेत. मात्र नवे तंत्रज्ञान तपासूनच स्विकारावे लागेल. शिक्षण विभागाच्या वतीने होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती वाढेल असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डाॕ. व्ही.एन.शिंदे यांनी व्यक्त केला. पिंपळगाव (ता.भुदरगड) येथील ५२व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलतांना डाॕ.शिंदे म्हणाल, अंदाधुंद प्रगतीमुळे विनाश होईल काय असा प्रश्न निर्माण होण्याची भिती आहे. वन्य जीव वनक्षेत्र सोडून मानवी हद्दीत येत आहेत कारण ते भुकेलेले आहेत.अरण्यक्षेत्रात त्यांचे पोट भरत नाही.जल,जंगल,जमीन या बाबी जपायलाच हव्यात .रात्रीच्या प्रखर वीज प्रकाशामुळे झाडांचा श्वसन वेग मंदावला आहे. असेच होत राहिले तर झाडेच नष्ट होतील.
ग्रंथ दिंडीने विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाची सुरवात झाली. पिंपळगाव विद्यालयाच्या विद्यार्थीनींचे लेझीम प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन डाॕ.व्ही.एन.शिंदे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक मुख्याध्यापक आनंदा लांबोरे यांनी केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, प्रा,राजेंद्र ठाकूर, विश्वनाथ कुंभार, बाजीराव दुधाळे ,सरपंच अश्विनी भोपळे यांची भाषणे झाली. यावेळी प्रा.विजय देसाई, दिनकरराव भोईटे, प्रबोध कांबळे, डी.डी.पाटील, धनाजी माद्याळकर, उत्तम पाटील,शोभा हेरेकर,दत्तात्रय रेडेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन परीट व संजय गुरव यांनी केले. विठ्ठल मगदूम यांनी आभार मानले.

चौकट- आमदार प्रकाश आबिटकर यांची राज्याच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्या बद्दल शिक्षण विभागाच्या वतीने अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

फोटो – पिंपळगाव ता.भुदरगड येथील विज्ञान प्रदर्शन उद्घाटन प्रसांगी डाॕ. व्ही.एन.शिंदे, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे आदी

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30