नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गगनबावडा तालुक्यातील सर्व हायस्कूल्स, काॅलेजीस आणि सार्वजनिक वाचनालयांना १६ जानेवारी रोजी पाचशे ग्रंथांची भेट – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

गगनबावडा तालुक्यातील सर्व हायस्कूल्स, काॅलेजीस आणि सार्वजनिक वाचनालयांना १६ जानेवारी रोजी पाचशे ग्रंथांची भेट

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

गगनबावडा तालुक्यातील सर्व हायस्कूल्स, काॅलेजीस आणि सार्वजनिक वाचनालयांना १६ जानेवारी रोजी पाचशे ग्रंथांची भेट

प्राचार्य जीवन साळोखे यांच्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत पद्मश्री डाॅ. ग.गो. जाधव महाविद्यालयात होणार ग्रंथांचा जागर

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गगनबावडा
गगनबावडा तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज व वरिष्ठ महाविद्यालयांसह शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना पाचशेहून अधिक ग्रंथभेट देण्याचा कार्यक्रम गुरुवारी १६ जानेवारीस समारंभपूर्वक होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार जीवन साळोखे यांच्या समृद्ध शालेय ग्रंथालय व वाचन प्रोत्साहनासाठी ग्रंथदान या उपक्रमांतर्गत हा ग्रंथभेट समारंभ पद्मश्री डॉक्टर ग.गो.जाधव महाविद्यालयात संपन्न होणार आहे.अशी माहिती प्राचार्य डाॅ. टी एम पाटील यांनी दिली.
यावेळी तालुक्यातील सर्व दहा हायस्कूल्स, चार ज्युनियर कॉलेज, दोन सिनियर कॉलेज आणि चार शासनमान्य वाचनालयांना दर्जेदार, वाचनीय पुस्तकांचे संच देण्यात येणार असून अशा प्रकारे ग्रंथदानकार्यक्रम गगनबावडा तालुक्यात प्रथमच होत आहे. शासनाच्या वाचन संकल्प पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या समारंभामुळे ग्रंथवाचनाचा आणि ग्रंथप्रसाराचा खऱ्या अर्थाने जागर होईल, अशी प्राचार्य डाॅ.पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, जीवन साळोखे यांनी २०२५ मध्ये शंभर शालेय ग्रंथालयांना दोन हजार पुस्तके भेट देण्याचे जाहीर केले असून, तीन जानेवारीस सावित्रीबाई फुले जयंती कोल्हापूर शहरातील सत्तावीस हायस्कूल्सना सहाशेहून अधिक ग्रंथभेट देवून त्यांनी मुख्याध्यापक संघात साजरी केली आहे.
दरम्यान, याच महिन्यात चंदगड तालुक्यातही ग्रंथदान समारंभ होणार असल्याचे श्री. जीवन साळोखे यांनी सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728