उदाजीराव अध्यापक विद्यालयात प्रशिक्षणार्थ्यांकडून डिजिटल परिपाठाचे सादरीकरण
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
उदाजीराव अध्यापक विद्यालयात प्रशिक्षणार्थ्यांकडून डिजिटल परिपाठाचे सादरीकरण
स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंती व मकर संक्रांती निमित्त शानदार कार्यक्रम संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
उदाजीराव अध्यापक विद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती, तसेच मकर संक्रांतीचा त्रिवेणी संगम साजरा करण्यात आला. हा संयुक्त कार्यक्रम प्रा.श्री. सुधीर गुरव आणि प्रा.सौ.महाजन यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राध्यापक श्री.पाटील होते.
द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सादर केलेल्या डिजिटल परिपाठ सादरीकरणाने उपस्थितांची वाहवा मिळवली. या परिपाठाची तयारी गेल्या दहा दिवसांपासून प्रा.गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होती. सरांनी आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
प्रा.सौ.महाजन यांनी आपल्या मनोगतातून सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांनी कार्यक्रमास प्रशिक्षणार्थ्यांना सहभागी करण्यासाठी घेतलेल्या विशेष मेहनतीचे कौतुक करण्यात आले. प्रास्ताविक श्री.जाधव यांनी केले. मकर संक्रांतीच्या निमित्ताने प्रथम व द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी तयार केलेल्या संक्रांत भेटकार्ड वाचने आणि उखाणे या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याशिवाय रांगोळी, फलकलेखन, भित्तीपत्रक, तसेच निवेदन आणि आभार प्रदर्शन अशा सर्व उपक्रमांत प्रशिक्षणार्थ्यांनी सहकार्याचे दर्शन घडवले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनाजी गुंड, संदीप देसाई, अर्चना कदम यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्या डॉ. सौ. मंजुषा माळी यांनी सर्वांचे कौतुक केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
