रांगणा पब्लिक स्कूलचे कार्य कौतुकास्पद : अभिनेते मदन पलंगे
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
रांगणा पब्लिक स्कूलचे कार्य कौतुकास्पद : अभिनेते मदन पलंगे
वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कडगाव
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रगतीबरोबरच कलागुणांना वाव देणाऱ्या रांगणा पब्लिक स्कूलचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोदगार सिने अभिनेते मदन पलंगे यांनी काढले. कडगाव (ता. भुदरगड) येथील रांगणा पब्लिक स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य मिलिंद पांगिरेकर अध्यक्षस्थानी होते.
स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थी व पालकांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. माजी सभापती विलास कांबळे, सरपंच सुभाष सोनार, माजी मुख्याध्यापक के. ए. देसाई, प्रा. धनाजी आरडे, अनिल कामिरकर प्रमुख पाहुणे होते.
मुख्याध्यापक दिपांजली डेळेकर यांनी स्वागत केले. संस्थापक प्रकाश डेळेकर यांनी प्रास्ताविक केले. मधुकर पाटील, संतोष शिंदे, संदीप देसाई, गणेश देसाई, प्रकाश खतकर, सतिश देसाई, प्रविण कदम, सुनिल देसाई, युसुफ शेख आदी उपस्थित होते. नारायण मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. संतोष सुतार यांनी आभार मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
