मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर जीवन साळोखे यांची विविध विषयांवरील तीन पुस्तके प्रसिद्ध
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर जीवन साळोखे यांची विविध विषयांवरील तीन पुस्तके प्रसिद्ध
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांची विविध विषयांवरील तीन पुस्तके प्रसिद्ध होत असल्याची माहिती “अभिनंदन प्रकाशन,कोल्हापूर” चे प्रसिद्ध प्रकाशक त्रिभुवननाथ जोशी यांनी दिली.
त्यामध्ये सकारात्मक, आशावादी विचारांचा भावरम्य आविष्कार करणारा “आनंदी जीवनाचा राजमार्ग” हा ललित लेखसंग्रह, विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांना यथोचित मार्गदर्शन करणाऱ्या उदबोधक लेखांचा “विद्यार्थ्यांच्या यशस्वी जीवनाची मास्टर की..!” हा शैक्षणिक लेखसंग्रह तर सर्व स्तरातील वाचकमनं समृद्ध करणाऱ्या, चिंतनशील, प्रेरक विचारांचा बहुचर्चित “विचारधन” हा विचारसंग्रह समाविष्ट आहेत.
जीवन साळोखे यांच्या आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सर्वच पुस्तकांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानेच त्यांच्या अनेक पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.
व्यक्तिगत आणि शालेय ग्रंथालयांसह सार्वजनीक वाचनालयांना ही सर्वच पुस्तके उपयुक्त आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
