गारगोटी हायस्कूल येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे उद्घाटन : ५२५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
गारगोटी हायस्कूल येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे उद्घाटन : ५२५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे उद्घाटन गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालय येथे समारंभपूर्वक संपन्न करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे प्रमुख उपस्थित होते. यावेळी ५२५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या पुणे येथे झालेल्या मुख्य उद्घाटन समारंभाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.
यावेळी शाळेतील ५२५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातील ३७ विद्यार्थ्यांना संदर्भ सेवेसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी झालेल्या समारंभात उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, एकात्मिक बाल विकास अधिकारी संतोष वरपे यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर, प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य दिलीप देसाई, रवि देसाई, डॉ. मीनाक्षी वारूशे, डॉ. सारिका कुंभार यासह फार्मासिस्ट, परिचरिका, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. महेश गोनुगडे यांनी केले. तर आभार डॉ. सागर भोई यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
