राज्यातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सर्वांगिण प्रयत्न होणार : अनुदानित वसतिगृह अधिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातील सुर
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
राज्यातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सर्वांगिण प्रयत्न होणार : अनुदानित वसतिगृह अधिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातील सुर
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, नाशिक
राज्यातील अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सर्वांगिण प्रयत्न करणार असल्याचे सूर येथील प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी दिसून आला. समाज कल्याण विभागाच्या वतीने नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात राज्यातील अनुदानित वसतिगृहाचे अधिक्षक यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी राज्यातील 2300 हुन अधिक वसतिगृहांचे अधिक्षक या प्रशिक्षण कार्यक्रमास हजर झाले होते.
सदर प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन माजी मंत्री श्री. बबनराव घोलप, समाज कल्याण विभागाचे सह आयुक्त, श्री. प्रमोद जाधव यांचे हस्ते करण्यात आले. तर समारोप प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री ना. श्री. संजय शिरसाट यांचे विशेष कार्य अधिकारी श्री. भरत कदम उपस्थित होते. या प्रसंगी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रविंद्र परदेशी, बार्टीचे प्रकल्प संचालक नितिन सहारे, उपायुक्त राकेश पाटील, जळगाव सहायक आयुक्त वाय.पी. पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, सहाय्यक संचालक शरद गायकवाड, जात पडताळणी समिती संशोधन अधिकारी योगेश पाटील, लेखाधिकारी राजु पाटोळे, अहिल्यानगरचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी रविदास कोकाटे, समाज कल्याण विभागाचे जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील, समाज कल्याण विभागाचे अधिकारी यांचे सह विविध मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभाग अंतर्गत अनुदानित वसतिगृह चालवली जातात. राज्यात सुमारे 2300 अनुदानित वसतिगृह सुरू आहे. त्यामध्ये 1800 मुलांचे व 500 वसतीगृह मुलींचे आहेत. सुमारे 90 हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची या वसतिगृहाच्या माध्यमातून सोय झाली आहे. ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात महत्त्वाची भूमिका या अनुदानित वसतिगृहांची आहे. सदर वसतीगृहातील अधीक्षक हा घटक महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रयत्न शासन स्तरावर होत आहे. त्यातूनच या वस्तीगृहातील अधीक्षक यांच्यासाठी एक दिवसाचे प्रशिक्षण कार्यक्रम समाज कल्याण विभागाने आयोजित केला होता. त्यामध्ये राज्यातील सुमारे 2300 अधीक्षक या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले होते.
सदर प्रशिक्षण प्रसंगी वैद्य अर्चना भास्करवार यांचे आहार व सर्वांगीण विकास या विषयावर तर श्री. प्रमोद जाधव यांचे वसतिगृह व्यवस्थापन तर श्री.यादव श्रीराम तरटे यांचे दैनंदिन व्यवस्थापन, कार्यक्षमता, संवाद कौशल्य या विषयावर मार्गदर्शन लाभले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल प्रादेशिक उपायुक्त श्री. माधव वाघ यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला. प्रशिक्षण कार्यक्रमास सहभागी झालेल्या राज्यभरातील वसतिगृह अधिक्षक यांनी देखील आयोजनाबद्दल समाजकल्याण विभागाचे आभार व्यक्त करून धन्यवाद दिले आहेत. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्रीमती सिमा पेटकर यांनी केले.
राज्यात शासनाच्या वतीने प्रथमच व्यापक स्वरूपाचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनुदानित वसतिगृहांचे व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी यावेळी सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
