‘आबिटकर नॉलेज सिटी’च्या माध्यमातून गुणवत्तापुर्ण विद्यार्थी घडतील : प्रांताधिकारी हरेश सुळ
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
‘आबिटकर नॉलेज सिटी’च्या माध्यमातून गुणवत्तापुर्ण विद्यार्थी घडतील : प्रांताधिकारी हरेश सुळ
आबिटकर नॉलेज सिटीच्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘आबिटकर नॉलेज सिटी’च्या माध्यमातून गुणवत्तापुर्ण विद्यार्थी घडत असून विविध क्षेत्रातील त्याची कामगिरी येथील शिक्षणाचा उच्च दर्जा सिध्द करते, असे गौरवोद्गार भुदरगड व आजरा तालुक्याचे प्रांताधिकारी हरेश सुळ यांनी काढले.
पाल (गारगोटी) येथे आबिटकर नॉलेज सिटीच्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रतापसिंह आबिटकर, प्राचार्य मिलिंद पांगीरेकर, रोहीत आबिटकर, धीरज देसाई, धीरज गुदगे प्रमुख उपस्थित होते.
प्रांताधिकारी सुळ म्हणाले, शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सहभाग नोंदवणे गरजेचे असुन त्यामुळे खिलाडी वृत्ती जोपासली जाऊन प्रत्येक कार्यात प्रसन्नता निर्माण होते. आबिटकर नॉलेज सिटीमधील अभ्यासपुर्ण व दर्जेदार कर्मचारी वृंद विद्यार्थ्यांना घडविण्यात यशस्वी झालेला आहे. विद्यार्थ्यांनीही फक्त प्रमाणपत्र करिता पदवी न घेता आपण सक्षम जबाबदारी स्वीकारत आहोत याची जाणीव ठेवून शिक्षण घेतल्यास मोठ्या संधी उपलब्ध होतील.
प्राचार्य मिलिंद पांगीरेकर म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात येथील विद्यार्थी आपली गुणवत्ता सिद्ध करीत असुन येथील प्रशासनही त्यांना सेवा सुविधा देण्यात अग्रेसर आहे.
प्राचार्य अमर चौगले म्हणाले की, इंजिनिअरींग कॉलेजला पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला असुन सर्व प्रकारच्या सेवा सुविधा देण्यात आम्ही कमी पडणार नाही.
कृषि महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.डी.पी.गोसावी म्हणाल्या, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत असुन येथील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली पात्रता सिद्ध करतील.
यावेळी प्राचार्य अमर चौगले, प्राध्यापिका धनश्री सोनकांबळे, प्रा.निकिता आबिटकर व विकास घरपणकर आदी प्राध्यापकांचा उल्लेखनिय कामगिरी केलेबदृदल सत्कार करण्यात आला. तसेच खोखो, कबड्डी, क्रिकेट, धावणे, बुध्दिबळ स्पर्धैतील खेळाडूना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तर प्रमुख पाहुण्याचा सत्कार प्रशासनाकडून करण्यात आला. या कार्यक्रमास प्रा.धिरज देसाई, पत्रकार अनिल कामिरकर, प्राचार्य अमर चौगले, प्राचार्या डॉ.डी.पी.गोसावी, आबिटकर इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक तुकाराम माने, कडगांव महाविद्यालयाचे प्रा.गुरुप्रसाद शेणवी यांच्यासह प्रमुख मान्यवर व दोन्ही कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा
