राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी मार्फत विविध सामाजिक उपक्रम
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी मार्फत विविध सामाजिक उपक्रम
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोनवडे
कोनवडे (ता.भुदरगड) येथील राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनीमार्फत २० मार्च ते २३ मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
या सामाजिक उपक्रमामध्ये दि २० मार्च रोजी १० गावांची स्मशानभूमी स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे .२० मार्च व २१ मार्च रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात येणार आहेत .२२ मार्च रोजी भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान घेणार येणार आहे . २२ मार्च रोजी रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे . दि .२२ मार्च व २३ मार्च रोजी ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शन घेण्यात येणार आहे .२३ मार्च रोजी पोलिस भरती लेखी परीक्षा , रक्तदान शिबीर , हळदी कुंकू समारंभ , पालक स्नेहमेळावा आणि राज्यस्तरीय लोकराजा समाजभुषण पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे .
या विविध कार्यक्रमासाठी पालकमंत्री प्रकाश अबिटकर , माजी आमदार के पी पाटील , तसेच जिल्हा परिषद आजी – माजी सदस्य , पंचायत समिती आजी -माजी सदस्य , जिल्हातील कुस्ती क्षेत्रातील वस्ताद , कुस्ती शौकिन , ग्रामस्थ , पालक उपस्थित राहणार आहेत.
या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
