शाळाशाळांतून वाचन संस्कृती वाढण्यास जीवन साळोखे यांचा ग्रंथदान उपक्रम उपयुक्त ठरणार असून त्यात चंदगड तालुका अग्रेसर राहील : माजी आमदार राजेश पाटील
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शाळाशाळांतून वाचन संस्कृती वाढण्यास जीवन साळोखे यांचा ग्रंथदान उपक्रम उपयुक्त ठरणार असून त्यात चंदगड तालुका अग्रेसर राहील : माजी आमदार राजेश पाटील
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, चंदगड
शाळाशाळांतून वाचन संस्कृती जोमाने वाढण्यास जीवन साळोखे यांचा ग्रंथदान उपक्रम हा उपयुक्त ठरणार आहे.
आणि त्यामध्ये चंदगड तालुका आघाडीवर राहील असा आशावाद माजी आमदार राजेश पाटील व्यक्त केला.
चंदगड तालुक्यातील ३१ माध्यमिक शाळा व ज्युनियर काॅलेजीसना ग्रंथदान समारंभात माजी आमदार राजेश पाटील अध्यक्षपदावरून बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार जीवन साळोखे यांच्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत ग्रंथभेट कार्यक्रमात चंदगड तालुक्यातील एकतीस हायस्कूल्सना साडेसहाशेहून अधिक वाचनीय, दर्जेदार पुस्तके यावेळी देण्यात आली. तुलसी बाजार, हलकर्णी फाटा येथे झालेल्या या कार्यक्रमास गटविकास अधिकारी बाळासाहेब भोजे, गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील, सौ.सुस्मिता राजेश पाटील हे प्रमुख पाहुणे होते.
आपल्या भाषणात माजी आमदार पाटील यांनी प्राचार्य जीवन साळोखे यांच्या गेली वीस वर्षे वाचन प्रोत्साहन आणि समृद्ध शालेय ग्रंथालयासाठी अखंड सुरू असलेल्या ग्रंथदान उपक्रमाचा मुक्तकंठाने गौरव करून, संपूर्ण जिल्ह्य़ात वाचन संस्कृती वाढीसाठी त्यांचे कार्य अनुकरणीय आणि आदर्शवत आहे. मुख्याध्यापक व शिक्षक अधिक वाचते झाले, तरच विद्यार्थी वाचते होतील. त्यासाठी शासनाचे वाचनविषयक उपक्रम सर्व शैक्षणिक घटकांनी एकजुटीने राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जीवन साळोखे यांनी वाचन प्रोत्साहनासाठी ग्रंथदान उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून सध्या होणाऱ्या वाचनाच्या घोर उपेक्षेमुळेच लोकसंख्या वाढत आहे मात्र माणसांची संख्या कमी होत आहे. सध्याच्या काळात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. परिणामी विद्यार्थी जीवन धोक्यात आले आहे. त्यांच्यावर वाचन संस्कार शाळाशाळांतून नव्याने करण्याचे आव्हान शिक्षक-पालकांसमोर उभे ठाकले आहे.
यावेळी गटशिक्षणाधिकारी वैभव पाटील, गटविकास अधिकारी श्री.भोजे यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाचन संस्कृती वाढवण्याशिवाय तरणोपाय नाही असे सांगून असा जाहीर उपक्रम तालुक्यात प्रथमच होत असल्याचे सांगितले.
यावेळी चंदगड तालुक्यातील एकतीस हायस्कूल्सना सुमारे पंचाहत्तर हजार रु.किमतीचे पुस्तक संच, ग्रंथालय शास्त्राचे जनक डाॅ.एस.आर. रंगनाथन आणि ग्रंथालयाची पाच तत्वे, विशेष दिन यांचे स्वतंत्र लॅमिनेटेड फोटो प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य एस.जी.पाटील यांनी तर समारोप जे.एस.पाटील यांनी केला. सूत्रसंचालन आर.डी.पाटील यानी केले. कार्यक्रमाचे नेटके संयोजन नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाने केले होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा
