नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जागतिक चिमणी दिनानिमित्त वर्ल्ड फॉर नेचरच्या वतीने ‘माझी चिऊताई अभियान’ उपक्रम उत्साहात – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

जागतिक चिमणी दिनानिमित्त वर्ल्ड फॉर नेचरच्या वतीने ‘माझी चिऊताई अभियान’ उपक्रम उत्साहात

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

जागतिक चिमणी दिनानिमित्त वर्ल्ड फॉर नेचरच्या वतीने ‘माझी चिऊताई अभियान’ उपक्रम उत्साहात

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
वर्ल्ड फॉर नेचर संस्थेच्या वतीने देशभक्त रत्नाप्पा कुंभार हायस्कूल, आर के नगर, पाचगाव व श्रीमती आनंदीबाई ना. सरदेसाई हायस्कूल, साळोखेनगर, कोल्हापूर तसेच मराठी विद्या मंदिर, वरगांव बेरडवाडा तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर
या तीन शाळेमध्ये जागतिक चिमणी दिवसानिमित्ताने “माझी चिऊताई अभियान” हा उपक्रम राबविला. प्रचंड उत्साहात सर्व विद्यार्थ्यांनी याला प्रतिसाद दिला.
या प्रबोधनात्मक संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांना चिमण्यांचे निसर्गातील महत्व व त्यांची भूमिका या विषयावर सविस्तर माहिती सांगण्यात आली.
आज आपण पाहतोय, चिमण्यांची संख्या खूपच कमी झालीय. मग चिमण्या गेल्यात तरी कुठे? का त्या रुसल्यात आपल्यावर? का त्या दुरावल्या आहेत आपल्यापासून? खरच आपण माणसं याला कारणीभूत आहोत का? या सर्व मुद्द्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधत सविस्तर मंथन करण्यात आले.
त्यांना या दिवसाचे महत्व समजावून सांगण्यात आले, चिमण्यांच्या अधिवास जपला जाण्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्यासाठी आपल्या परिसरात कोणती झाडे झुडपे लावली पाहिजेत, चिमण्यांची संख्या वाढण्यासाठी प्रत्यक्ष Field Activity काय करता येईल यावर विद्यार्थ्यांशी विस्तृत चर्चा करण्यात आली.
तसेच जर शक्य असेल तर आपल्या घराजवळ, जवळच्या शाळा, कॉलेजेस किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरात जाऊन विद्यार्थ्यांना तसेच इतर नागरिकांना या उपक्रमाचे महत्व समजावून प्रत्येकाला ही कृती करायला सांगा.असे आवाहन वर्ल्ड फॉर नेचर संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
हा उपक्रम राबविण्यासाठी देशभक्त रत्नाप्पा कुंभार शाळेचे शाळेच्या मुख्याध्यापिका बिरजे मॅडम,सुनिता मोठे मॅडम, राजीव मुंडे सर, संध्या कुलकर्णी मॅडम, वैजनाथ पवार सर तसेच श्रीमती आनंदीबाई ना सरदेसाई हायस्कूल, साळोखेनगर, कोल्हापूर शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक मिलिंद कोपार्डेकर सर, आरती कोपार्डेकर, वंदना पाटील, सारिका भोसले, बाबासो भुसनर यांचे सहकार्य लाभले.
यावेळी वर्ल्ड फॉर नेचरचे अभिजीत वाघमोडे, प्रसन्न वरखेडकर, निलेश भोसले,जोतिबा जोशीलकर, तुकाराम नाईक उपस्थित होते.

“सर्वांनी मिळून दुरावलेल्या चिऊताईला पुन्हा बोलवूया व पर्यावरण रक्षणासाठी सज्ज होऊया”

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728