आयटीआय संघटनांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : आमदार जयंत आसगावकर
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
आयटीआय संघटनांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध : आमदार जयंत आसगावकर
राज्य आयटीआय निदेशक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, सातारा
सर्व निदेशक बांधवांना सोबत घेऊन पुढे जाणारी संघटना म्हणून राज्य आयटीआय संघटना परिचित आहे. या संघटनांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या २३ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन, शेंद्रे, सातारा येथे आज, रविवारी हा कार्यक्रम झाला.
यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले, माझ्या निवडणुकीत आयटीआय संघटनेने मला एकमुखी पाठिंबा दिला. संघटनेचे हे ऋण माझ्यावर सदैव राहील. येणारे नवीन शैक्षणिक धोरण हे कौशल्य विकास आधारित असणार आहे. यासाठी आयटीआयमध्ये नवनवीन ट्रेड वाढवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे. आयटीआयमधील कर्मचाऱ्यांच्या कंत्राटीकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठी माझा लढा सुरू आहे. आयटीआयमध्ये नवीन शिक्षक भरती, कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल सुविधा देणे आणि जुनी पेन्शन लागू करण्यासाठी माझा शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत.
या कार्यक्रमाला युनायटेड फेडरेशनचे सल्लागार भोजराज काळे, राज्याध्यक्ष तथा महासचिव महादेव माळी, सरचिटणीस विनोद दुर्गपुरोहित, कार्याध्यक्ष नेताजी दिसले, सचिव विजयकुमार शिंदे, नॅशनल फेडरेशनचे उपाध्यक्ष अनिल भोसले, आयटीआय निदेशक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनोद पाटील, राज्य मध्यवर्ती संघटनेचे खजिनदार गणेश देशमुख, आयटीआय निदेशकचे माजी राज्याध्यक्ष चंद्रकांत दिसले, आयटीआय प्राचार्य संजय मांगलेकर यांच्यासह राज्यातून आयटीआय निदेशक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
