अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात उभारली पुस्तकांची अनोखी गुढी
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात उभारली पुस्तकांची अनोखी गुढी
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
राजापूर तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, अक्षरमित्र बी. के. गोंडाळ यांनी गुढीपाडव्याचे औचित्य साधून त्यांच्या जुवाठी आनंदवनातील अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांमध्ये पुस्तकांची अनोखी गुढी उभी करण्याचा उपक्रम राबविला.
राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी स्वखर्चाने वाचनालये उभी करण्यासह समाज प्रबोधनाचे विविधांगी उपक्रम राबविणारे गोंडाळ यांच्या पुस्तकाची गुढी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देशपातळीवर चालणाऱ्या स्पर्धा परीक्षेची प्राथमिक स्तरावर माहिती व्हावी. तसेच ग्रामीण भागातून जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी निर्माण होण्यासाठी स्वखर्चाने अक्षरमित्र स्पर्धा केंद्राची उभारणी केली आहे. त्यांच्या वाचनालय निर्मीती चळवळीची प्रेरणा घेवून अनेकांनी राजापूर तालुक्यात वाचनालय उभारणी केली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली विधवा प्रथा बंद करण्यासाठी गोंडाळ यांनी विधवा मातांसोबत हळदीकुंकू व त्यासोबत प्रबोधनात्मक व्याख्यान ठेवून अशा उपक्रमातून ग्रामीण भागातील लोकांत मिसळून समाजप्रबोधन करत आहेत. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा वारसा आपल्या दैनंदिन कृतिशील जगण्यातून जपण्याचा
आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहेत. तसेच ते राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळाशाळामधून अक्षर सूधार उपक्रम घेत आहेत. यावेळी यावेळी उपस्थित महिलांमधून मालती गोंडाळ. सुनंदा मयेकर. वनिता मयेकर. निरंजनी मयेकर. सत्यवती महंकाळ व चंद्रभागा मयेकर या महिलांच्या हस्ते. दीपप्रज्वलन तर उपस्थित विद्यार्थ्यांमधून राखी मयेकर. आदीती सूर्यवंशी. सिद्धी मयेकर. मधूरा तेली. कार्तिकी लेंबरकर. जागृती भांबळे या विद्यार्थीनीं पुस्तक पुजन केले. गोडाळ यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पूस्तक वाचण्याचे महत्त्व सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा
