नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आबिटकर कृषी महाविद्यालयातर्फे भुदरगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम : जपला ऐतिहासिक वारसा – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आबिटकर कृषी महाविद्यालयातर्फे भुदरगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम : जपला ऐतिहासिक वारसा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आबिटकर कृषी महाविद्यालयातर्फे भुदरगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम : जपला ऐतिहासिक वारसा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
युवा ग्रामीण विकास संस्था संचलित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय, पाल (गारगोटी) येथील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या ३५१ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ल्यावर जाऊन स्वच्छता मोहीम राबवली आणि वृक्षारोपण केले.
यावेळी किल्ल्यावर जमा झालेला केर कचरा गोळा करण्यात आला तसेच किल्ल्या समोरील भागाची स्वच्छता करण्यात आली आणि किल्ल्यामध्ये विविध ठिकाणी वटवृक्षाची लागवड करण्यात आली.
ज्या पवित्र भूमीवर शिवरायांनी अनेक पराक्रम केले अशा गडावर स्वच्छता मोहीम कृषी महाविद्यालयाने राबवली. त्यातून ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला.
आपल्या पुढच्या पिढीस हा वारसा अभिमानाने दाखवता यावा त्याकरिता असे उपक्रम कृषी महाविद्यालयातून राबविण्यात येतील, असे वक्तव्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.दीपाली गोसावी यांनी केले.
यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर, यांचे मार्गदर्शन लाभले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30