नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शालेय विद्यार्थ्यांत कायद्याबाबत जागरुकता निर्माण होण्यासाठी कायदे विषयक शिबीर महत्वाचे : न्यायाधीश श्री.एम.डी.रुद्रभटे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शालेय विद्यार्थ्यांत कायद्याबाबत जागरुकता निर्माण होण्यासाठी कायदे विषयक शिबीर महत्वाचे : न्यायाधीश श्री.एम.डी.रुद्रभटे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शालेय विद्यार्थ्यांत कायद्याबाबत जागरुकता निर्माण होण्यासाठी कायदे विषयक शिबीर महत्वाचे : न्यायाधीश श्री.एम.डी.रुद्रभटे

गारगोटी हायस्कूलमध्ये कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान होऊन या वयातच कायद्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर महत्वाचे आहे, असे उदगार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री.एम.डी.रुद्रभटे यांनी काढले.
गारगोटी हायस्कूल येथे विधी सेवा समिती गारगोटी, बार असोसिएशन गारगोटी व गारगोटी हायस्कूल अँड श्री. समर्थ ज्युनिअर कॉलेज यांच्यातर्फे
आयोजित कायदे विषयक मार्गदर्शन शिबीरप्रसंगी न्यायाधीश श्री.एम.डी.रुद्रभटे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
प्रारंभी दीप प्रज्वलन दिवाणी व फौजदारी न्यायाधीश श्री.एन.डी.रुद्रभटे यांच्या हस्ते करण्यात आले. न्यायाधीश श्री.एन.डी.रुद्रभटे यांनी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा २०१३’ या संदर्भात मार्गदर्शन केले.
जेष्ठ वकील ॲड.एस.डी.भोसले यांनी शालेय जीवनात कायद्याचे ज्ञान घेणे आवश्यक आहे. वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही शाळकरी मुले तिब्बल सीट गाडी चालवितात. यातून होणारे अपघात व त्यामुळे पालकांना होणारा त्रास याबाबत माहिती दिली.
ॲड.श्री.व्ही.डी.म्हांगोरे यांनी ‘बाल विवाह प्रतिबंधक कायदा २००६’ या विषयावर मार्गदर्शन करताना बाल विवाहास कायद्याने बंदी असूनही बालविवाह केल्यास होणाऱ्या परिणामांची माहिती दिली.
ॲड.हर्षदा पोर्लेकर यांनी ‘नागरिकांची मूलभूत कर्तव्ये’ या विषयावर मार्गदर्शन करताना भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांस अधिकार दिले आहेत त्याबरोबर ११ मूलभूत कर्तव्ये, जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडणे आवश्यक आहे.
ॲड.अपुर्वा देसाई यांनी ‘पोक्सो ॲक्ट’ या विषयावर मार्गदर्शन करताना लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठीच पोक्सो ॲक्टची निर्मिती झाली असल्याचे सांगितले.
प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी बाल गुन्हेगारी वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करुन शालेय वयातच कायद्याबाबत ज्ञान होणे आवश्यक असून यासाठी अशा शिबिरांची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी गारगोटी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.संग्रामसिंह कडव, ॲड.ए. व्ही. करवळ, ॲड.ए. बी. पोर्लेकर, सौ.एस. एस.कागवाडे यांच्यासह विधिज्ञ्, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत श्री. युवराज शिगावकर यांनी प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी आभार व सूत्रसंचलन श्री.आर.पी.गव्हाणकर यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728