नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , आबिटकर कृषी महाविद्यालयात कृषी दिन साजरा : महाविद्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना गांडुळखताचे वाटप – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

आबिटकर कृषी महाविद्यालयात कृषी दिन साजरा : महाविद्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना गांडुळखताचे वाटप

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

आबिटकर कृषी महाविद्यालयात कृषी दिन साजरा : महाविद्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना गांडुळखताचे वाटप

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
युवा ग्रामीण विकास संस्था संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न आबिटकर कृषी महाविद्यालय, पाल येथे कृषी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ग्रामपंचायत खानापूर येथे जाऊन तेथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, त्याचे फायदे आणि त्याचा योग्य वापर करणे का गरजेचे आहे यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना कृषी महाविद्यालयात तयार केलेले गांडुळखताचे वाटप करण्यात आले.
संपूर्ण देशाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.वसंतराव नाईक यांची ओळख हरितक्रांतीचे प्रणेते म्हणून आहे. राज्यातील शेती समृद्ध होण्यासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानांची गरज लक्षात घेऊन त्यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. कृषी क्षेत्रात आमूलाग्र विकास घडवून त्यांनी शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला त्याप्रित्यर्थ १ जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रारंभी प्रास्ताविक डॉ. एन. एस.पाटील यांनी केले तर सेंद्रिय शेतीवरील मार्गदर्शन प्रा. शिल्पा बेलदार यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत खानापूरचे सरपंच, ग्रामसेवक, शाळा समिती अध्यक्ष, राजमाता गर्ल्स हायस्कूलचे प्राचार्य व शिक्षक, कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दिपाली गोसावी, प्राध्यापक वर्ग , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व शेतकरी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728