नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऊस उत्पादकता वाढ अभियान शुभारंभ : कृषीशास्त्रज्ञ डॉ.शांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऊस उत्पादकता वाढ अभियान शुभारंभ : कृषीशास्त्रज्ञ डॉ.शांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऊस उत्पादकता वाढ अभियान शुभारंभ : कृषीशास्त्रज्ञ डॉ.शांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी विभाग जिल्हा परिषद, कोल्हापूर व आत्मा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी दिन व हेक्टरी १२५ मे. टन ऊस उत्पादकता वाढ अभियान शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी कृषीशास्त्रज्ञ डॉ. शांतीकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यातील सरासरी ऊस उत्पादकता वाढवण्यासाठी या अभियानाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्ह्यातील विविध भागातील पुरस्कार प्राप्त शेतकरी, कृषी विभागातील सर्व पदाधिकारी व मान्यवर यांना मातीचे आरोग्य सुधारून उसाचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य पद्धतीने नियोजन करण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. जमिनीची मशागत करण्यापासून ते ऊस कारखान्याला जाईपर्यंत कशा पद्धतीने त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याचे नियोजन केले पाहिजे व आपल्या ऊसाचे उत्पादन वाढवले पाहिजे यावरती सखोल चर्चा झाली.
या कार्यक्रमासाठी नामदार श्री. प्रकाश आबिटकर हे व्हीसी द्वारे सहभागी होऊन मार्गदर्शन केले. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कार्तिकेयन एस, विभागीय कृषी सहसंचालक श्री. बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जालिंदर पांगरे, प्रकल्प संचालक आत्मा श्रीम. रक्षा शिंदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, सौ. सारिका वसगावकर, उपसंचालक श्री. नामदेव परीट, तालुका कृषी अधिकारी करवीर श्री. युवराज पाटील तसेच कृषी विभागातील सर्वच अधिकारी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत भविष्यामध्ये देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन करून त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहण्याचा मानस व तसे सहकार्य करण्याची भावना कृषीशास्त्रज्ञ डॉ. शांतीकुमार पाटील यांनी केली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031