नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , घटनेने दिलेला पेन्शनचा अधिकार काढून घेणे घटनाविरोधी, संघर्षाची तयारी आवश्यक : डॉ.अर्जुन कुंभार – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

घटनेने दिलेला पेन्शनचा अधिकार काढून घेणे घटनाविरोधी, संघर्षाची तयारी आवश्यक : डॉ.अर्जुन कुंभार

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

घटनेने दिलेला पेन्शनचा अधिकार काढून घेणे घटनाविरोधी, संघर्षाची तयारी आवश्यक : डॉ.अर्जुन कुंभार

भुदरगड तालुका सेवानिवृत्त कर्मचारी मेळावा संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
पेन्शन ही सामाजिक सुरक्षितता आहे. घटनेने पेन्शनचा अधिकार दिला आहे. ती सरकारची कृपा नव्हे. हा चरितार्थाचा अधिकार काढून घेणे घटनाविरोधी आहे. त्यामुळे सर्वांनी सावध राहून संघर्षाची तयारी केली पाहिजे, असे उदगार डॉ.अर्जुन कुंभार यांनी काढले.
श्री.शाहू वाचनालय, गारगोटी येथे भुदरगड तालुका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी डॉ.अर्जुन कुंभार होते. निवृत्त वेतन व निवृत्तीवेतन सुधारणा अधिनियम २०२५ या विषयावर विचार विनिमय करण्यासाठी भुदरगड तालुक्यातील शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक श्री.डी.एस. देसाई यांनी केले. श्री.डी.डी.कडव यांनी या विषयाच्या संदर्भात वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्या सर्वांच्या निदर्शनास आणून दिल्या.
श्री.अरुण पाटील यांनी या पेन्शन विरोधी कायद्याच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी भुदरगड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक संघ तयार असल्याचे सुचित केले. श्री.एम.एम. कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख मार्गदर्शक व मेळाव्याचे अध्यक्ष डॉ.अर्जुन कुंभार यांनी सर्व सेवानिवृत्त संघटना एकत्र आल्याबद्दल अभिनंदन केले. वृत्तपत्र आणि समाज माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष येऊ घातलेल्या वेतन सुधार कायदा २०२५ संबंधी तरतुदीबाबत निर्माण होत असलेले संभ्रम गैरसमज, शक्यता आणि वास्तव याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. न्यायालयात जाण्यासाठी निर्बंध म्हणजे लोकशाही मूल्यावर गदा असून संपूर्ण नियंत्रण सरकारकडे व कायद्याचे संभाव्य दुष्परिणाम या मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेतला. त्याचबरोबर जनसुरक्षा सुधारित विधेयक २०२५ याबाबत बाबनिहाय सखोल मार्गदर्शन केले.
सदर मेळाव्याला बी.एस.माने, शिवाजीराव हवालदार, पी.एस.कांबळे, आनंदराव जाधव, आनंदराव देसाई, के.टी. कांबळे, बबन तोरस्कर, मारुती लाड, यशवंत सरदेसाई, आर. के. देसाई, पी.जी.केणे, डी. डी. पाटील, एस.एम.पाटील, डी.बी नलवडे, एस. पी. पाटील, रवी पाठक सर्व विभागाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार एम. एस. मोरस्कर यांनी केले. सूत्रसंचालन टी. बी. यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728