नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , ग्रंथदान उपक्रमांतर्गत मराठी आवृत्तीतील भारतीय संविधानाच्या शंभर प्रती भेट देणार : जीवन साळोखे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

ग्रंथदान उपक्रमांतर्गत मराठी आवृत्तीतील भारतीय संविधानाच्या शंभर प्रती भेट देणार : जीवन साळोखे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

ग्रंथदान उपक्रमांतर्गत मराठी आवृत्तीतील भारतीय संविधानाच्या शंभर प्रती भेट देणार : जीवन साळोखे

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे हे संविधानाच्या मराठी‌ आवृत्तीच्या शंभर प्रतींचे वाटप करणार आहेत. त्याची सुरुवात राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नाम.प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम.हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना संविधानाची प्रत, प्रत्यक्ष भेट देवून साळोखे यांनी उपक्रमाला सुरुवात केली आहे.
भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीचे हे “अमृत महोत्सवी वर्ष” आहे. प्रजासत्ताकाच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे यांनी जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, वकील, उद्योजक आणि संस्थाचालक यांना ग्रंथदान उपक्रमांतर्गत भारतीय संविधान भेट देणार आहेत. हे पुस्तक संविधानाची संपूर्ण मराठी प्रत असून “पास पब्लिकेशन कंपनी, नागपूर” यांनी प्रकाशित केलेल्या ‘भारताचे संविधान’ या पुस्तकाच्या मराठी भाषेतील १०० प्रती जीवन साळोखे हे संबंधितांना भेट देणार आहेत.
१४ एप्रिल २०२५ पर्यंत फेरबदल केल्याप्रमाणे आणि १०६ व्या सुधारणेपर्यंत अद्ययावात अशी ही संपूर्ण मराठी भाषेत संविधानाची प्रत आहे. संविधानातील नेमक्या तरतुदी काय आहेत, त्यांचा मराठीत अर्थ काय आहे, याविषयी सामान्यजन अनभिज्ञ आहेत. जगातील प्रत्येक देशाला त्या देशाची स्वतःची राज्यघटना लागू आहे. ‘राज्यघटने शिवाय राज्य असूच शकत नाही. राज्यघटने शिवाय राज्य म्हणजे अराजकता आणि बेबंदशाही होय. ‘ भारतीय राज्यघटना हा देशाचा आत्मा आहे. राज्यघटनेतील नियम देशाच्या प्रत्येक नागरिकाला माहीत असायलाच हवेत. सामान्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किमान घटकांना तरी, राज्यघटनेतील तरतुदींची मराठीमध्ये माहिती मिळावी या व्यापक हेतूने निवृत्त प्राचार्य जीवन साळोखे यांनी ग्रंथदान उपक्रमांतर्गत संविधान भेट देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या मराठी आवृत्ती मध्ये संविधानाच्या निर्मितीची, घटना समितीची आवश्यक माहिती दिली आहे.
श्री.साळोखे हे २००६ पासून ग्रंथदान हा उपक्रम सातत्याने व अखंडपणे जिल्हाभर राबवत आले आहेत. जिल्ह्यातील सुमारे ३५० शाळा व महाविद्यालयाच्या ग्रंथालयांना, एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेबरोबरच विविध प्रकारची, वाचनीय आणि संग्राह्य अशी सुमारे १८ हजार पुस्तके त्यांनी दान दिली आहेत.सेवानिवृत्तीनंतरही, स्वनिधीतून राबवला जात असलेला त्यांचा हा “एकहाती उपक्रम” अनुकरणीय असून ग्रंथदान आणि वाचन चळवळीला बळ देणारा नक्कीच आहे.

फोटो : पालकमंत्री प्रकाश अबिटकर, नामदार हसन मुश्रीफ तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना संपूर्ण मराठीतील संविधान भेट देताना ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728