राजापूर तालुक्यातील चार प्राथमिक शाळेत अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांचा हस्ताक्षर सुधार उपक्रम : सुमारे ११५ विद्यार्थ्यांना दिले हस्ताक्षर सुधारण्याचे धडे
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
राजापूर तालुक्यातील चार प्राथमिक शाळेत अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांचा हस्ताक्षर सुधार उपक्रम : सुमारे ११५ विद्यार्थ्यांना दिले हस्ताक्षर सुधारण्याचे धडे

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
राजापूर तालुक्यातील कोंढेतड गाडगीळ वाडी, शिळनं१, कन्याशाळा राजापूर व केंद्रशाळा गुजराळी या चार प्राथमिक शाळेत जुवाठी माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांनी हस्ताक्षर सुधार उपक्रम घेतला. या शाळेतील सुमारे ११५ विद्यार्थ्यांना हस्ताक्षर सुधारण्याचे प्राथमिक धडे दिले.
सुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिणा आहे. नव्हेतर तो आपल्या शिक्षण प्रक्रीयेचा आत्मा आहे. सुंदर हस्ताक्षरात आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब दिसत असते. आपण आज कितीही डिजिटल झालो तरी हस्ताक्षराचे महत्त्व कमी झालेले नाही. आपले हस्ताक्षर सुंदर असावे. व त्याची सवय आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने अंकुरणाऱ्या बालवयातच लागावी. यासाठी बी. के. गोंडाळ यांनी राजापूर तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळेत आपल्या आईच्या स्मरणार्थ स्वखर्चाने हा उपक्रम गेल्यावर्षीपासून राबवत आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या मित्रपरिवाराच्या सहकार्याने स्वतंत्र वहीची छपाई केली आहे. ती वही एका शाळेतील किमान २०-३० विद्यार्थ्यांना मोफत दिली जाते. व त्या वहीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सराव दिला जातो. यावेळी कोंढेतड गाडगीळ वाडी शाळेत मुख्याध्यापिका सौ.रेणुका चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुभाष नवाळे अंगणवाडी शिक्षिका सौ.सारिका कोतरे, पालक सौ.मानसी नवाळे सौ.सीमा तावडे श्री.साई लांजेकर उपस्थित होते.
शिळ नं. १ या शाळेत मुख्याध्यापक सुरेश पवार, सहाय्यक शिक्षक जयश्री नाईक, अनिल बाणे उपस्थित होते. कन्याशाळा राजापूर येथे मुख्याध्यापिका सौ. सायली भडाळे, सहायक शिक्षक सुहास काडगे, सौ.सुचिता तवटे, श्रीम. मिताली आंगणे, श्रीम. सुवर्णा सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका सायली भडाळे व शिक्षक सुहास काडगे यांनी प्रत्येकी एक हजार रुपये गोंडाळ यांच्या उपक्रमाला देणगी दिली. केंद्रशाळा गुजराळी मध्ये केंद्रप्रमुख अनिल जायदे मुख्याध्यापिका सौ.मनिषा विचारे, सहायक शिक्षिका मृण्मयी हातणकर, निशा रणजित देसाई, अपर्णा शिंदे, शितल शिंदे व गोंडाळ यांच्या पत्नी मालती गोंडाळ उपस्थित होत्या.
आतापर्यंत बी.के.गोंडाळ यांनी तालुका व तालुका बाहेर सोळा ठिकाणी हा उपक्रम राबविला आहे. यामध्ये प्राथमिक माध्यमिक शाळा, वसतीगृह, संस्कारशिबीरे यांचा समावेश आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





