नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , लोक कलाकारांसाठी कविवर्य सखाराम खोत यांचे लिखाण प्रेरणादायी : पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

लोक कलाकारांसाठी कविवर्य सखाराम खोत यांचे लिखाण प्रेरणादायी : पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

लोक कलाकारांसाठी कविवर्य सखाराम खोत यांचे लिखाण प्रेरणादायी : पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर

कविवर्य सखाराम खोत लिखित ‘ज्ञानबंधू गाथा’ पुस्तकाचे उत्साहात प्रकाशन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
कविवर्य सखाराम खोत यांनी परिस्थितीवर मात करत कला जोपासली. लोककलाकार म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांसाठी कविवर्य सखाराम खोत यांचे लिखाण प्रेरणादायी आहे, असे गौरवोदगार राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी काढले.
गारगोटी येथे कविवर्य व शाहीर सखाराम संभाजी खोत (बंधू-सखा) यांच्या ‘ज्ञानबंधू गाथा’ खंड १ ते ७ या पुस्तकांचे प्रकाशन राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते व शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
यावेळी बोलताना नामदार प्रकाश आबिटकर म्हणाले, कविवर्य सखाराम खोत यांचे लिखाण प्रगल्भ विचारावर आधारित आहे. कविवर्य सखाराम खोत यांनी केलेले लिखाण हे युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. लोककलाकार म्हणून विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांच्यासाठी एकूण आदर्श म्हणून त्यांच्या लिखाणाकडे पाहिले जाईल.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रा.डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, कविवर्य सखाराम खोत यांच्या पुस्तकावर भविष्यात संशोधन होऊ शकेल. त्यांचे लिखाण समाज प्रबोधनासाठी उपयुक्त ठरेल. कविवर्य खोत यांनी केलेले लेखन डॉक्टरेट मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शोध प्रबंध ठरु शकेल. प्रकाशित झालेले हे सातही खंड साहित्य क्षेत्रातील मापदंड ठरतील असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी याप्रसंगी भाई आनंदराव आबिटकर, सदाशिव खेगडे, श्री.मौनी विद्यापीठाचे शासकीय प्रतिनिधी बाजीराव चव्हाण, गारगोटीचे उपसरपंच प्रशांत भोई, शाहीर सखाराम लोंढे, शाहीर जयवंत रणदिवे (सांगली), सचिन माळी (मंडणगड, रत्नागिरी), सयाजी गायकवाड (सोलापूर), तानाजी कुराडे (कोल्हापूर), दत्तात्रय सावंत महाराज, कवी सातापा सुतार यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत शेकडो शाहीर व लोककलाकार उपस्थित होते. याप्रसंगी जयवंत वायदंडे यांच्यासह कलाकारांनी लोककलाकारांच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री नाम. आबिटकर यांना दिले.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक सर्जेराव मोरे यांनी, पाहुण्यांचा परिचय प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा.अतुल कुंभार यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728