नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बहुजन समाजातील मुले शिकावी यासाठी धडपडणाऱ्या कै.देसाई यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य वाखाणण्याजोगे : आमदार जयंत आसगावकर – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

बहुजन समाजातील मुले शिकावी यासाठी धडपडणाऱ्या कै.देसाई यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य वाखाणण्याजोगे : आमदार जयंत आसगावकर

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

बहुजन समाजातील मुले शिकावी यासाठी धडपडणाऱ्या कै.देसाई यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य वाखाणण्याजोगे : आमदार जयंत आसगावकर

म्हसवे येथे कै.शंकरराव देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
बहुजन समाजातील मुले शिकावी, पुढे जावी हे स्वप्न उराशी बाळगून धडपडणाऱ्या कै.शंकरराव देसाई यांचे स्वप्न त्यांचे बंधू कै. तुकाराम देसाई यांनी ५० – ६० वर्षांपूर्वी म्हसवे गावात शाळेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या पुढील पिढीने आदर्श शाळा निर्माण केली. कै.देसाई यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे, असे उदगार शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी काढले.
शंकरराव देसाई हायस्कूल, म्हसवे (ता.भुदरगड) या शाळेत श्रीमान शंकरराव रामोजी देसाई यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थी, मान्यवर सत्कार व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी केडीसीसी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर होते. यावेळी पत्रकार विजय चोरमारे यांचे व्याख्यान झाले.
यावेळी बोलताना आमदार जयंत आसगावकर म्हणाले, भुदरगड हा हुतात्म्यांचा तालुका म्हणून सर्व दूर परिचित आहेच त्याबरोबर शिक्षणाची पंढरी म्हणूनही ओळखला जातो. सध्या पटसंख्याअभावी वाड्यावस्त्यवरील, ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या शाळा टिकल्या पाहिजेत, हीच आमची भूमिका आहे. माझा आमदार फंड हा रस्ते, गटारी यासाठी न वापरता तो केवळ शाळांसाठी वापरलेला आहे. त्यामुळे मतदारसंघातील पाच हजाराहून अधिक शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केलेले आहे.
महाराष्ट्र दिनमानचे संपादक, आयबीएन लोकमतचे समीक्षक डॉ.विजय चोरमारे यांनी ‘विद्यार्थी व पालकांपुढील आव्हाने’ या विषयावर बोलताना मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व आहे. इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढत असल्याने पालक विद्यार्थी संवाद हरवत चालला आहे. पालकांच्या पुढे मोबाईलसह अन्य माध्यमांचा असणारा प्रभाव मुलांच्या आवडीनुसार न झालेला शैक्षणिक प्रवेश त्याचबरोबर एकलकोंडेपणा वाढण्याची कारणे, परदेशी स्थायिक होण्याची अनेक कारणे तसेच प्रवेश घेण्यासाठी लागणारी अनेक दिव्य या स्पर्धात्मक विभाग टिकून राहायचं असेल तर पालक विद्यार्थी यांचा समन्वय साधणे गरजेचा आहे. पालकांची शिक्षणाबद्दलची जागरूकता अधिक प्रगल्भपणे होणे आवश्यक आहे.
जिल्हा बँकेचे संचालक प्रा.अर्जुन आबिटकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शंकरराव देसाई यांचा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय वारसा हा आपल्या सर्वांकरता आदर्श असून देसाई कुटुंबीयांची वाटचाल अतिशय स्तुत्य आहे.
यावेळी दहावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थी सुहास धनाजी नलवडे, वेदिका अमर रेपे, प्रतीक्षा रघुनाथ देसाई, वक्तृत्व स्पर्धेमध्ये लहान गट : प्रथम क्रमांक राजनंदिनी अमर रेपे, द्वितीय क्रमांक प्रत्येक रघुनाथ देसाई, तृतीय क्रमांक वेदिका सुरेश मोरे, मोठा गट : प्रथम क्रमांक यशस्वीनी युवराज देसाई, द्वितीय क्रमांक समीक्षा संदीप सांडुगडे, तृतीय क्रमांक श्रेया दत्तात्रय खोत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष निवासराव देसाई, सचिव बाळासाहेब देसाई, उपाध्यक्ष शरद देसाई, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुरेशराव पाटील, माजी सभापती बाबा नांदेकर, अशोकराव भांदीगरे, कल्याणराव निकम, सुरेशराव देसाई, मदन देसाई, एम आर. टीपुगडे, मधुकर पाटील, आनंद देसाई, हंबीरराव देसाई, सुभाष देसाई, गोविंद देसाई, मिलिंद पांगिरेकर, अनंत डोंगरकर, प्रकाश गायकवाड, एम एस पाटील, शामराव मोहिते, मुख्याध्यापक सागर पाटील, दिगंबर जाधव, हरिदास देसाई, मोहन पाटील, रवी देसाई, अजित यादव, जयसिंग नागटीळे, शिवाजीराव जाधव, डी एस कुंभार, शशिकांत कासार, उदय पाटील, केके पाटील, डी एस देसाई यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
स्वागत उपाध्यक्ष शरद देसाई यांनी, प्रास्ताविक व अहवाल वाचन मुख्याध्यापक डी.एम. कासारीकर यांनी आभार जय भवानी सोसायटीचे चेअरमन विरेंद्रसिंह बाळासाहेब देसाई यांनी तर सूत्रसंचालन अनिल यादव यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728