नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , दूधगंगा विद्यालयाच्या विद्यार्थींनींनी गणपतराव गाताडे निवासी व निवासी बौद्धिक अक्षम विद्यालयातील विद्यार्थ्यांना राखी बांधून दिला मायेचा ओलावा – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

दूधगंगा विद्यालयाच्या विद्यार्थींनींनी गणपतराव गाताडे निवासी व निवासी बौद्धिक अक्षम विद्यालयातील विद्यार्थ्यांना राखी बांधून दिला मायेचा ओलावा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

दूधगंगा विद्यालयाच्या विद्यार्थींनींनी गणपतराव गाताडे निवासी व निवासी बौद्धिक अक्षम विद्यालयातील विद्यार्थ्यांना राखी बांधून दिला मायेचा ओलावा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कागल
जगातील इतर संस्कृतीचे अनुकरण करताना भारतीय संस्कृती आणि परंपरा कालबाह्य होत आहेत की काय अशी अवस्था असताना सर्व भारतीय यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरा यांची जोपासना करणे व ती टिकवणे गरजेचे आहे असे उदगार मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी काढले.
कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ संचलित दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल येथे ‘रक्षाबंधन’ हा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
श्री.बुगडे म्हणाले, विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरांबद्दल माहिती देणे आणि भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे महत्त्व समजावून सांगणे हा प्रमुख उद्देश या सणाचा आहे. आपल्या भाषणात रक्षाबंधनाचा ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोन स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, हा सण केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक नाही, तर तो प्रत्येक व्यक्तीला समाजातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान करण्याचे आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
कार्यक्रमातील सर्वात हृदयस्पर्शी भाग म्हणजे स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी निवासी बौद्धिक अक्षय विद्यालयातील विद्यार्थ्यांना दूधगंगा विद्यालयातील विद्यार्थ्यीनींनी राखी बांधून मायेचा ओलावा निर्माण केला आणि त्यांच्या प्रती चांगल्या भावना व्यक्त केल्य. तसेच निसर्गाप्रती कृतज्ञता जोपासताना शालेय परिसरातील वृक्षांना राखी बांधण्यात आली व पर्यावरण पूरक रक्षाबंधन साजरे करण्यात आले . यावेळी विद्यार्थीनींनी सर्व विद्यार्थांना, शिक्षकांना आणि शाळेतील महिला शिक्षिका यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना राखी बांधली.
सुत्रसंचलन हर्षदा घाटगे हिने तर आभार तनुश्री तारदाळकर हिने मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031