नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चिपळूण तालुका हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने विविध उपक्रमाने हिंदी पंधरावडा साजरा – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

चिपळूण तालुका हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने विविध उपक्रमाने हिंदी पंधरावडा साजरा

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

चिपळूण तालुका हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने विविध उपक्रमाने हिंदी पंधरावडा साजरा

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, चिपळूण
चिपळूण तालुका हिंदी अध्यापक मंडळाच्यावतीने १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत हिंदी पंधरावडा अंतर्गत शालेय स्तरावर विविध विद्यार्थी उपक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सांगता युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण येथे उपस्थित मान्यवरांच्या समवेत संपन्न झाला.महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सल्लागार अनिलकुमार जोशी, युनायटेड इंग्लिश स्कूलचे उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, पर्यवेक्षक रेवती कारदगे, प्रशिक्षण मार्गदर्शक मौलासो नदाफ, सलीमा नदाफ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. सुंदर असे स्वागत व प्रार्थना गीत युनायटेड इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी गायले तर लययुक्त संगीत साथ पराग लगाटे यांनी दिली.
चिपळूण तालुक्यातील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षणसेवा देणाऱ्या उपक्रमशील १५ शिक्षकांना, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
चिपळूण तालुका अंतर्गत काव्यवाचन व्हिडिओ स्पर्धेचा निकाल असा
प्रथम : दूर्वा भोसले इ.७ वी युनायटेड इंग्लिश स्कूल, द्वितीय : ईश्वरी पाथरे मार्गताम्हाणे विद्यालय, तृतीय : सृष्टी भैरवकर खदीजा इंग्लिश स्कूल, तर उत्तेजनार्थ : स्वरा भडवळकर दलवाई हायस्कूल
तालुकास्तरीय कविता लेखन प्रतियोगिता स्पर्धेत सृष्टी शांताराम जाधव (प्रथम) न्यू इंग्लिश स्कूल तळसर, स्वराली सतिश मुणगेकर (द्वितीय) परांजपे मोतिवाले हाईस्कूल,सावली विलास गुख (तृतीय) युनाइटेड रांग्लश स्कूल, सातिका महेंद्र कदम (उत्तेजनार्थ) न्यू इंग्लिश स्कूल खडपोली तसेच निधी दिपक गांधी (उत्तेजनार्थ) वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय मार्गताम्हाणे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
‘उपक्रमशील शिक्षक कसा असावा’ या विषयावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन श्री.नदाफ, श्री निकम यांनी केले. यावेळी अनिलकुमार जोशी, राजेंद्र खांबे, मिलिंद कडवईकर यांनी काळानुरूप अध्यापनात कसा बदल करावा याविषयी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सल्लागार अनिल कुमार जोशी, उपाध्यक्ष राजेंद्र खांबे, रत्नागिरी जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद कडवईकर, उपाध्यक्षा मुग्धा पवार,प्रमुख मार्गदर्शक मौलासो नदाफ, बँक ऑफ महाराष्ट्र मॅनेजर श्री.धिरज बारवी, बँक ऑफ महाराष्ट्र अधिकारी आशिष कुमार, चिपळूण नगर परिषद अधिकारी प्रसाद साडविलकर , नगर परिषदचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, निवृत्त विस्तार रमाकांत पवार, तसेच चिपळूण तालुका हिंदी अध्यापक मंडळाचे सर्व पदाधिकारी सलीमा नदाफ, मानसी पेढांबकर, राजेश माळी, उज्वला लोखंडे, राखी भुरण, मोहन पवार, रवींद्र गुरव, शक्तीकुमार चव्हाण, युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध तसेच प्रोजेक्टर ऑपरेटर म्हणून विशाल कदम, संघटना अध्यक्ष सलीमा नादाफ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन परवेज पिरजादे यांनी केले तर आभार उज्वला लोखंडे यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728