मिणचे खुर्दच्या गौरी देसाई यांना पीएच.डी. पदवी प्रदान
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
मिणचे खुर्दच्या गौरी देसाई यांना पीएच.डी. पदवी प्रदान

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मिणचे खुर्द
मिणचे खुर्द (ता.भुदरगड) येथील गौरी पांडुरंग देसाई यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागातून “Indigenous Responses to Bubonic Plague Epidemics in Southern Bombay Presidency” (दक्षिण बॉम्बे इलाख्यामधील गाठीच्या प्लेगच्या साथीवर स्थानिक प्रतिसाद) या प्रबंधासाठी पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
या संशोधनासाठी त्यांना मार्गदर्शक म्हणून डॉ. बी. एस. माळी तसेच इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन कार्य यशस्वी करण्यासाठी वडील श्री. पांडुरंग शामराव देसाई, आई सौ. सविता पांडुरंग देसाई व पती श्री. हर्षवर्धन पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





