‘ताम्हण’ वृक्षाचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी ‘जिथे शाळा तिथे राज्यपुष्प’ : वर्ल्ड फॉर नेचर उपक्रम
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
‘ताम्हण’ वृक्षाचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी ‘जिथे शाळा तिथे राज्यपुष्प’ : वर्ल्ड फॉर नेचर उपक्रम

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
वर्ल्ड फॉर नेचर संस्थेने ब्रह्मांड सामाजिक राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ताम्हण या वृक्षाची व त्याच्या फुलांची सर्वांना ओळख व्हावी व यातून त्याबद्दल असलेले महत्व अधोरेखित व्हावे यासाठी कोल्हापूर शहर व आसपासच्या परिसरातील प्रत्येक शाळेत ताम्हण रोपाची लागवड करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘जिथे शाळा तिथे राज्यपुष्प’ या नावाने हा उपक्रम आजपासून आपल्या कोल्हापूर शहरात व आसपासच्या परिसरात राबवण्यात येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत पहिले ताम्हणचे रोप आज राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन, शिंगणापूर (ता.करवीर) येथे लावण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे राज्यप्राणी, राज्यपक्षी, राज्यवृक्ष, राज्यफळ यांची माहिती देण्यात आली व राज्यपुष्प ताम्हण वृक्षाची फुले याबद्दल त्याचे महत्व सांगण्यात आले. यानंतर मोठ्या उत्साहाने शाळेतील विद्यार्थ्यांनी ताम्हणच्या रोपाचे रोपण केले.
आपल्यातील बहुतांश जणांना ‘महाराष्ट्राचे राज्यपुष्प’ कोणते आहे हे माहिती नाहीय. याबद्दल आपल्यातील बहुतांशी लोक अनभिज्ञ आहेत. आपल्याला राज्यप्राणी, राज्यपक्षी माहिती असतात. पण राज्यफूल म्हटले की सर्रास सर्वजण कमळ, गुलाब या फुलांची नावे सांगतात.
ताम्हण (जारूळ) या वृक्षाला येणारे फुल हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपुष्प आहे. राज्यप्राणी, राज्यपक्षी यासारखेच राज्यपुष्प माहिती असणे खूप महत्वाचे आहे.
या विषयाचे महत्व लक्षात घेऊन वर्ल्ड फॉर नेचर संस्थेने ब्रह्मांड सामाजिक राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने ‘जिथे शाळा तिथे राज्यपुष्प’ या नावाने हा उपक्रम आजपासून आपल्या कोल्हापूर शहरात व आसपासच्या परिसरात राबवण्यात येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत पहिले ताम्हणचे रोप आज राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन, शिंगणापूर (ता.करवीर) येथे लावण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचे राज्यप्राणी, राज्यपक्षी, राज्यवृक्ष, राज्यफळ यांची माहिती देण्यात आली व राज्यपुष्प ताम्हण वृक्षाची फुले याबद्दल त्याचे महत्व सांगण्यात आले. यानंतर मोठ्या उत्साहाने शाळेतील विद्यार्थ्यांनी ताम्हणच्या रोपाचे रोपण केले. या रोपट्याची रोज देखभाल करण्याची जबाबदारी शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
यावेळी शाळेतील मुख्याध्यापिका सौ.ए.एस.बोथीकर, सौ.पी.व्ही.कोळी, सौ.एस.एस.कुंभार, सौ.एस.एम.शेख, श्री.एस.एफ.थोरात, श्री.एस.डी.सणगर, सौ.ए.एस.गोणी, सौ.व्ही.आर.दिंडे व वर्ल्ड फॉर नेचर संस्था व ब्रह्मांड सामाजिक राष्ट्रसेवा प्रतिष्ठानचे दिग्विजय शिर्के, चारुहास रेडेकर, अभिजीत वाघमोडे उपस्थित होते.
ज्या शाळेत महाराष्ट्राचे राज्यपुष्प ताम्हण वृक्षाचे रोपण करायचे आहे अशा शाळांनी निर्मला बेदरे पाटील (९४०३२३१४८७), दिग्विजय शिर्के (९७६२७०२७५७), अभिजीत वाघमोडे (९८५०३३९३७३) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





