भविष्यात आबिटकर कृषी महाविद्यालयास आयसीएआर नामांकन मिळणार : दत्तात्रय उगले
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
भविष्यात आबिटकर कृषी महाविद्यालयास आयसीएआर नामांकन मिळणार : दत्तात्रय उगले

आबिटकर कृषी महाविद्यालयात दीक्षारंभ समारंभ संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
श्री.आनंदराव आबिटकर कृषी महाविद्यालयाने अल्पावधीत उल्लेखनीय कार्य केले असून भविष्यात या कृषी महाविद्यालयास आयसीएआर नामांकन मिळेल असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठाचे सदस्य दत्तात्रय उगले यांनी केले.
युवा ग्रामीण विकास संस्था संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न श्री. आनंदराव आबिटकर कृषी महाविद्यालय, पाल (गारगोटी) येथे विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.उगले बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर होते.
यावेळी बोलताना श्री.उगले म्हणाले, विद्यार्थ्यांनी ध्येयपूर्ती करण्यासाठी जिद्द व चिकाटीने प्रयत्न केल्यास निश्चित यश मिळू शकते. आबिटकर कृषी महाविद्यालयातून शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे कृषी संशोधक निर्माण व्हावेत.
यावेळी बोलताना प्राचार्य अर्जुन आबिटकर म्हणाले, कृषि शिक्षण म्हणजे फक्त बी-बियाणे, माती व शेतीपुरते मर्यादित नाही. हे शिक्षण म्हणजे संशोधन, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत विकासाची जाण व अन्नसुरक्षेची हमी आहे. कृषी कॉलेजच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून शेती उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारे विद्यार्थी, कृषी तंत्रज्ञ घडावेत अशी अपेक्षा आहे. कृषी कॉलेजच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून शेती उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणारे विद्यार्थी, कृषी तंत्रज्ञ घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी गारगोटी हायस्कूल व समर्थ ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, कृषी महाविद्यालयाचे सल्लागार, शास्त्रज्ञ डॉ.शांतीकुमार पाटील यांची भाषणे झाली. यावेळी दीक्षारंभ अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कृषी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिपाली गोसावी यांनी आभार प्रा.घोसाळे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. चेतन चौगुले यांनी केले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





