वन्यजीव सप्ताह निमित्ताने पडखंबे येथे वन्यजीव चित्र रंगभरण स्पर्धा संपन्न
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
वन्यजीव सप्ताह निमित्ताने पडखंबे येथे वन्यजीव चित्र रंगभरण स्पर्धा संपन्न

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने विद्यामंदिर पडखंबे (ता.भुदरगड) या शाळेत वन्यजीव चित्र रंगभरण स्पर्धा व वन्यजीव जनजागृती प्रबोधनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वनविभाग भुदरगड व पर्यावरणमित्र अवधूत पाटील यांच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.
ऑक्टोबर महिन्यातील पहिला आठवडा नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करुन त्याबाबत जनजागृती करणे, वन्यजीवांचे महत्व लोकांना पटविणे याकरिता १९५२ पासून वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करतात. वन्यजीवांबद्दल खऱ्या अर्थाने प्रबोधन व्हायचे असल्यास शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी हा उत्तम पर्याय होऊ शकतो म्हणून जिल्हा परिषदेच्या पडखंबे येथील शाळेत चित्र रंगभरण स्पर्धा, वन्यजीव विशेषता सर्पविषयक प्रबोधन, प्रश्नमंजुषा असे कार्यक्रम घेत विजेत्यांना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये विद्यामंदिर पडखंबे, वरपेवाडी व न्हाव्याचीवाडी येथील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी सहभाग घेतला.
यावेळी बोलताना गारगोटी वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश तायनाक यांनी वन्यजीवांचे मानवी अन्नसाखळीतील महत्व विषद केले. पर्यावरणमित्र अवधूत पाटील यांनी सर्पविषयक समज गैरसमज या विषयावर प्रबोधन केले. सदर कार्यक्रमात वनअधिकारी बळवंत शिंदे, वनरक्षक एस.बी.तांबेकर, संतोष गोजारे, वनिता कोळी, निकिता चाळक, विद्यामंदिर न्हाव्याचीवाडीचे सुनिल निकम, अध्यापिका आसमा काझी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ कु.जान्हवी पाटील हिने सादर केलेल्या झाडांच्या कवितेने झाली. प्रास्ताविक विद्यामंदिर पडखंबे शाळेचे मुख्याध्यापक तानाजी धारपवार यांनी केले. सूत्रसंचालन अध्यापक पांडुरंग गुरव यांनी व विद्यामंदिर वरपेवाडी मुख्याध्यापिका संपदा यादव यांनी आभार मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा





