ग्रंथांची माहिती, डॉ.कलाम यांना अभिवादन, वृत्तपत्रविक्रेत्यांचा सत्कार : नुतन मराठी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची अक्षर दालनला भेट
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
ग्रंथांची माहिती, डॉ.कलाम यांना अभिवादन, वृत्तपत्रविक्रेत्यांचा सत्कार : नुतन मराठी विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची अक्षर दालनला भेट

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कोल्हापूर
ग्रंथ आणि पुस्तकांची माहिती, डॉ.एपीजे अब्दूल कलाम यांना अभिवादन आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम येथील ‘अक्षर दालन’ येथे आयोजित करण्यात आला होता. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला.
नुतन मराठी विद्यामंदिरच्या ४० विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त बुधवारी दुपारी येथील अक्षर दालनला भेट दिली. यावेळी विविध विषयांवरची पुस्तके, ग्रंथ, दिवाळी अंक यांची त्यांना माहिती देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यिकांची आणि त्यांच्या ग्रंथसंपदेचीही माहिती रवींद्रनाथ जोशी यांनी दिली. यावेळी वृत्तपत्रविक्रेते सुनील समडोळीकर आणि संजय मोरे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. अब्दूल कलाम यांनी वृत्तपत्रविक्रेता म्हणूनही लहानपणी काम केले होते. इथंपासून राष्ट्रपतीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा कष्टाचा, अभ्यासाचा, जिद्दीचा अणि परिश्रमाचा आहे. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी ठेवावा, असे आवाहन यावेळी संजीवनी देशपांडे यांनी केले. यावेळी एकता सोळुंके यांनी आभार मानले.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space





