ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे ९ जानेवारीस “कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरुन” उलगडणार आपल्या एकहाती ग्रंथदान उपक्रमाचा प्रवास…!
|
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
ज्येष्ठ साहित्यिक जीवन साळोखे ९ जानेवारीस “कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरुन” उलगडणार आपल्या एकहाती ग्रंथदान उपक्रमाचा प्रवास…!

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
ज्येष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त प्राचार्य जीवन साळोखे “कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावरुन” उलगडणार आपल्या एकहाती ग्रंथदान उपक्रमाचा प्रवास. शुक्रवार, दि.९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा. होणाऱ्या संवादातून ग्रंथदान प्रवासातील अनुभव, भावना आणि या मुलखावेगळ्या उपक्रमामागील निष्ठा आणि श्रद्धा या वेधकपणे उलगडल्या जाणार आहेत.
आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या दुनियेत पुस्तकांचा सुगंध हळूहळू विरत जात आहे, हे आपल्याला मान्य करावेच लागेल. असे असतानाही…, शब्दांशी, अक्षरांशी आणि विचारांशी नातं जपणाऱ्या प्रत्येकासाठी शुक्रवार, दि.९ जानेवारी हा दिवस महत्वाचा आहे.
आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून शुक्रवार, दि.९ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा. रसिक श्रोत्यांच्या मनात नेहमीच घर करून राहिलेल्या “इंद्रधनू” या श्रोत्यांच्या मनपसंत, आवडत्या कार्यक्रमात ग्रंथदानातून देऊ, वाचन चळवळीला गती…!” या विषयावर, एका अत्यंत जिव्हाळ्याचा, प्रेरणादायी आणि मायमराठीवर प्रेम करणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या मनामनात रुंजी घालणाऱ्या भावनांना साद देणारा, संवाद साधत आहेत प्रसिद्ध निवेदिका ऐश्वर्या बेहरे.
शाळा-महाविद्यालयांमधील असंख्य मुलांच्या हाती पुस्तकांची भेट देणारे, सलग वीस वर्षे निरपेक्ष भावनेने, ग्रंथदानाचे व्रत अखंड जपणारे ज्येष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त प्राचार्य जीवन साळोखे यांच्याशी. त्यांच्या ग्रंथदान प्रवासातील अनुभव, भावना आणि या मुलखावेगळ्या उपक्रमामागील निष्ठा आणि श्रद्धा या संवादातून वेधकपणे उलगडल्या जातील.
मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांसाठी, वाचनावर श्रद्धा ठेवणाऱ्यांसाठी आणि पुस्तकांमुळे माणूस घडतो. यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी हा संवाद म्हणजे मनाला स्पर्श करणारा एक संस्कारक्षम क्षण आहे म्हणूनच सर्व वाचनप्रेमींनी याचा अवश्य लाभ घ्यावा.
|
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space





