नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्काराने विजयराव घोलपे सन्मानित – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्काराने विजयराव घोलपे सन्मानित

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य पुरस्काराने विजयराव घोलपे सन्मानित

हिवरे बाजार (अहमदनगर) येथे दिमाखदार सोहळा : मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा राजगुरुनगर व कै. नानासाहेब गोरडे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पद्मश्री नामदेव ढसाळ जयंती सोहळा व साहित्य पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावर्षीचा डॉ. आनंद यादव स्मृती सर्वोत्कृष्ट आत्मचरित्र-आत्मकथन-चरित्र पुरस्कार गारगोटी येथील विजयराव घोलपे यांना त्यांच्या ‘डॉ. डी.वाय पाटील साहेबांच्या सहवासात’ या ग्रंथासाठी आदर्श गाव हिरवे बाझारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार व जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. आदर्शगाव हिवरे बाजार (जि.अहमदनगर) येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस (माजी अध्यक्ष, अ.भा.म. साहित्य संमेलन) उपस्थित होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रमुख उपस्थितीत पुरुषोत्तम सदाफुले (महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद), ॲड. सतीश गोरडे (अध्यक्ष, नानासाहेब गोरडे सार्वजनिक वाचनालय), शरदराव बुट्टे (माजी जि.प. सदस्य, व्याख्याता यशदा पुणे), संतोष गाढवे (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर) तसेच सदाशिव आमराळे (उपाध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.
या ग्रंथाचे शब्दांकन सुनील देसाई यांनी केले आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे असून, हा पुरस्कार आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते विजयराव घोलपे यांना प्रदान करण्यात आला.
श्री.विजयराव घोलपे यांनी आपल्या लेखनातून केवळ व्यक्तिचित्रण न करता एका युगपुरुषाच्या कार्य, विचार आणि मूल्यांचा साहित्यिक दस्तऐवज समाजासमोर ठेवला आहे. त्यांच्या लेखणीतील संवेदनशीलता, अनुभवसंपन्नता आणि प्रामाणिक अभिव्यक्तीमुळे हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
या कार्यक्रमात साहित्य, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती लाभली होती. विजयराव घोलपे यांच्या या सन्मानामुळे साहित्यप्रेमी, शिक्षक व वाचकवर्गात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930