नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विद्यार्थ्यांना शाळेत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशास्त्राच शिक्षण दिले तरच ते विवेकवादी विचार करतील : प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ डॉ प्रदीप पाटील यांचे प्रतिपादन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

विद्यार्थ्यांना शाळेत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशास्त्राच शिक्षण दिले तरच ते विवेकवादी विचार करतील : प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ डॉ प्रदीप पाटील यांचे प्रतिपादन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

विद्यार्थ्यांना शाळेत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशास्त्राच शिक्षण दिले तरच ते विवेकवादी विचार करतील : प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ डॉ प्रदीप पाटील यांचे प्रतिपादन

निळपण येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, निळपण
विद्यार्थ्यांना शाळेतूनच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशास्त्राच शिक्षण द्यायला हवे तरच विद्यार्थी विवेकवादी बनतील व विवेकवादी विचार करतील, धर्म आणि देवाच्या नावाखाली सगळीकडे फसवले जात आहे यासाठी मुलांना विवेकी ज्ञान देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक डॉ प्रदीप पाटील यांनी व्यक्त केले.
जवाहर हायस्कूल, निळपण (ता. भुदरगड) येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात समारोप व्याख्यांनप्रसंगी आयोजित व्याख्यानप्रसंगी ‘चला मुलांना तर्कशुद्ध विचार करायला शिकवूया’ (RATIONAL THINKING) या विषयावर सांगली येथील प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ व समुपदेशक डॉ प्रदीप पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश एस. एस. जगताप होते.
डॉ. प्रदीप पाटील म्हणाले, अविवेकी विचारसरणीमुळे अनेक प्रश्न निर्माण होताहेत. देशातील नागरिकांचं वर्तन विवेकवादी असेल तरच देश महासत्ता होईल. विवेकवाद हा विचाराचा भाग आहे. विचार मनाचा भाग असतो. विवेकी जीवनासाठी आठ तास झोप, अर्धा तास व्यायाम, तणावमुक्त जीवन, वेळेवर जेवण असायला हवे. मुलांनी चिकित्सक विचार करायला हवा यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. जिथे विज्ञान संपते तिथं भोंदूगिरी सुरू होते. आयुष्यात शोषणमुक्त होण्यासाठी प्रत्येकाने विवेकवादी बनलं पाहिजे.
विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी वेळोवेळी मार्गदर्शनाबरोबर सहकार्य केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राथमिक, माध्यमिक शिक्षक व विद्यार्थी यांची संगीत मैफिल झाली. यावेळी दिवाणी न्यायाधीश व्ही. बी.मुल्ला, महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्ष व्ही. एन. घाटगे, संस्थाअध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. संग्रामसिंह कडव, सौ. परांजपे, सरपंच वैशाली पाटील, अ‍ॅड. ए. व्ही. देसाई, अ‍ॅड. आर. ए. नाईक, अ‍ॅड. व्ही. डी. म्हागोरे, अ‍ॅड. बी. पी. जगदाळे, अ‍ॅड. एस. टी. देसाई, शिक्षण विस्ताराधिकारी प्रबुद्ध कांबळे, उत्तम पाटील, निवृत्ती भाटले, शिक्षक बँक संचालक बाळकृष्ण हळदकर, पांडुरंग हळदकर, मिलिंद पांगिरेकर, केंद्रप्रमुख संजय कुकडे, डॉ.ए.एम.पाटील, मोहन घाटगे, बबन इंदुलकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील, मुख्याध्यापक व्ही.आर.नलवडे, एस. एम. पाटील, शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष वजीर मकानदार, प्रकाश पाटील, आदींसह तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत मुख्याध्यापक श्री.एन. एस. सारंग यांनी प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र शिंदे व अभिजित पोवार यांनी तर आभार सागर पाटील यांनी मानले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930