शिवाजी विद्यापीठांतर्गत ज्युदो स्पर्धेत आबिटकर महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्षवर्धन गाडेकर यास गोल्डमेडल : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
शिवाजी विद्यापीठांतर्गत ज्युदो स्पर्धेत आबिटकर महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्षवर्धन गाडेकर यास गोल्डमेडल : राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, कडगाव
कडगाव (ता.भुदरगड) येथील श्री.आनंदराव आबिटकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी कु.हर्षवर्धन संजय गाडेकर (बी.एस्सी.भाग -2) याने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत इंटर झोनल ज्युदो स्पर्धेत (८१ किलो वजन गट) ‘गोल्डमेडल’ मिळवले. कु.हर्षवर्धन गाडेकर याची ‘वेस्ट झोन’ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे..
कु.हर्षवर्धन संजय गाडेकर यास युवा ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांचे प्रोत्साहन, प्रभारी प्राचार्य गुरुप्रसाद शेणवी तसेच क्रिडाशिक्षक व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. कु.गाडेकर याचा सत्कार प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी युवा नेते संजय गाडेकर, प्र.प्राचार्य गुरुप्रसाद शेणवी, माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर शिंदे, श्री.नारायण निकम आदी उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
