अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांना रोटरी क्लब चा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ प्रदान
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांना रोटरी क्लब चा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ प्रदान
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
जुवाठी (ता.राजापूर) येथील माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक अक्षरमित्र बी.के.गोंडाळ यांना रत्नागिरी येथील रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने ॲड.शाल्मली आंबुलकर यांच्या हस्ते नेशन बिल्डर (राष्ट्र निर्माते) अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. रत्नागिरी येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात हा सत्कार सोहळा पार पडला.
रोटरी क्लब ही २१० देशात सामाजिक काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. १९५७ पासुन रत्नागिरी जिल्ह्यात या संस्थेने काम सुरु केले. समाजाच्या जडणघडणीत व राष्ट्र उभारणीत विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना नेशन बिल्डर अवॉर्ड देउन ही संस्था सन्मान करते. या सन्मानासाठी राजापूर तालुक्यातून बी. के. गोंडाळ यांची निवड करण्यात आली.
बी. के. गोंडाळ यांनी राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात वाचनालय निर्मिती मध्ये खुप मोठे योगदान आहे. तालुक्यात त्यानी स्वखर्चाने आपल्या आईच्या स्मरणार्थ तेरा वाचनालये उभी केली आहेत.विधवामाता प्रबोधन, वाचनवीर पुरस्कार, हस्ताक्षर सुधार उपक्रम, स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन, संविधान जागर कार्यक्रम, श्यामची आई वाचन-परीक्षण व ग्रथभेट उपक्रम, राष्ट्र सेवा दल संस्कार शिबीर आदी विविध उपक्रम गोंडाळ राबवत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना नेशन बिल्डर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
यावेळी अध्यापक विद्यालयाच्या प्रा. राजश्री देशपांडे, कॅप्टन दिलीप भाटकर, प्रा. चरणदास कांबळे, रोटरीचे अध्यक्ष रूपेश पेडणेकर, विनायक हातखंबकर, सेक्रेटरी मनीष नलावडे, रविंद्र इनामदार, मुग्धा कुळ्ये, संजय कुळ्ये, गुरुवर्य प्रा. आत्माराम मेस्त्री,नंदकुमार साळवी धरमसिंह चव्हाण, मालती गोंडाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
