नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , गारगोटी हायस्कूलने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून वेगळी ओळख निर्माण केली : गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

गारगोटी हायस्कूलने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून वेगळी ओळख निर्माण केली : गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

गारगोटी हायस्कूलने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून वेगळी ओळख निर्माण केली : गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे

शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते ‘ई लर्निंग’चे उद्घाटन

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
गारगोटी हायस्कूलने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे उदगार गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी काढले.
भुदरगड शिक्षण संस्था संचलित गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, नूतन मराठी शाळा व मुक्तांगणच्या ३४ व्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित पारितोषिक समारंभात गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी भुदरगड शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव ॲड. गणेश मुंगळे होते. शाळेतील ‘ई लर्निंग’चे उद्घाटन शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या निमित्ताने आयोजित माता पालकांच्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्या अनुक्रमे सौ.तेजस्विनी सुहास शिंदे, सौ. धनश्री प्रवीण वारके, सौ.दिपाली रविंद्र पाटील तसेच संगीत खुर्ची स्पर्धेतील विजेत्या अनुक्रमे सौ. नीता मनोज देसाई, सौ.पूजा हेमंत कालेकर, सौ.आरती अशोक आमटे यांचा सत्कार करण्यात आला.
एन.एम.एम.एस. परीक्षेत राज्यात तृतीय क्रमांक पटकावलेल्या कु. सौम्या संदीप काकडे तर शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी सौम्या काकडे, श्रेया पाटील, अन्वित सावंत यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी कु.सानिका बापुसो जाधव हिचा सत्कार करण्यात आला. शालेय क्रीडा स्पर्धेत चॅम्पियनशिप मिळवलेल्या कु.सुरज सर्जेराव थोरबोले व कु.श्रावणी अनिल देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवल्याबद्दल जेष्ठ शिक्षक श्री.आर.पी.गव्हाणकर, सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. तृप्ती मिलिंद पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त
श्री.जी.डी.ठाकूर, आदर्श लिपिक पुरस्कारप्राप्त श्री.विजय स्मार्त, डॉ. जे. पी. नाईक पतसंस्थेच्या संचालकपदी निवडीबद्दल पी. पी. भंडारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी उत्तमकुमार पाटील, गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर, उपसरपंच सागर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी खोत यांची भाषणे झाली. याप्रसंगी गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे, संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष आर. जी. पाटील, आनंदराव जाधव, हणबरवाडीच्या सरपंच सौ.सुनीता खोत, अल्केश कांदळकर, बापूसो जाधव, मुख्याध्यापक एन. जी.कांबळे, आर डी पोवार, आर.वाय.देसाई, बी.डी. कांबळे, सौ. भारती शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सौ.सरोजिनी कॉलनीचे चेअरमन एन.जे. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल आरबुणे, सुरेश कांबळे, विजय पंडित आदी उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य अजित देसाई व श्री.प्रशांत भोई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नामदेव पांडुरंग शिंदे उपस्थित होते. फनीगेम्सचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य, प्राचार्या सौ.मंजुषा माळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्री.मौनी विद्यापीठाचे संचालक डॉ.पी.बी.पाटील, माजी सरपंच सौ. रुपाली राऊत, बळवंत फराक्टे उपस्थित होते.
यावेळी आयोजित हळदीकुंकू समारंभात ९५० महिलांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी माजी सरपंच वृषाली देसाई (काकी), सौ.धनश्री वारके, सौ.कुसुम पसारे, सौ.करुणा कांबळे आदी प्रमुख उपस्थित होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.किरण लोंढे यांच्या हस्ते श्री. मौनी विद्यापीठाचे माजी सदस्य अल्केश कांदळकर, श्री.जी.डी.ठाकूर, बी.ए.डावरे, एस. एस. नाईक, एस.एम.साळवी, युवराज शिगावकर, श्रीमती आर.आर.बहादुरे, बी. के. इंगळे, प्रा.शेखर देसाई, प्रा.सौ.स्मिता पाटील, प्रा.सौ.तृप्ती पाटील, प्रा.सौ. रोहिणी निकम, प्रा.सौ.स्नेहा साळोखे, सौ. एल.आर.पाळेकर, सौ. सुजाता पाटील, सौ.राजवी साठे, ऋषिकेश गव्हाणकर, धीरज मेंगाणे, अमृत देसाई, विजय स्मार्त यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत व अहवालवाचन प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी केले. आभार क्रीडा प्रमुख पी.पी.भंडारी यांनी तर आभार एच.बी. देसाई यांनी मानले तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.पी. गव्हाणकर यांनी केले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30