नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिल्ह्यातील शंभर हायस्कूल्सना दोन हजार पुस्तके भेट देवून नव्या वर्षाचे स्वागत – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

जिल्ह्यातील शंभर हायस्कूल्सना दोन हजार पुस्तके भेट देवून नव्या वर्षाचे स्वागत

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

जिल्ह्यातील शंभर हायस्कूल्सना दोन हजार पुस्तके भेट देवून नव्या वर्षाचे स्वागत


जीवन साळोखे यांचा ग्रंथदान उपक्रम सुरूच

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुरगूड
२००६ पासून सुरू असणाऱ्या ग्रंथदान उपक्रमांतर्गत प्राचार्य जीवन साळोखे हे जिल्ह्यातील शंभर हायस्कूल्सना यावर्षीही दोन हजार पुस्तके भेट देवून नव्या वर्षाचे स्वागत करणार आहेत. प्राचार्य साळोखे हे दरवर्षी ग्रंथदान करून नवीन वर्षांचे स्वागत करत आले आहेत. समृद्ध शालेय ग्रंथालय आणि वाचन प्रोत्साहन यासाठी ग्रंथदान उपक्रम एक अभियान म्हणून ते जिल्हाभर एकहाती राबवत आहेत.
ग्रंथदान उपक्रमांतर्गत यावर्षी जानेवारी महिन्यात कोल्हापूर शहर व परिसरातील पंचवीस हायस्कूल्स आणि चंदगड तालुक्यातील पंचवीस हायस्कूल्स, वाचनालयाना समारंभपूर्वक ग्रंथभेट देण्यात येणार आहेत. त्यापुढील टप्प्यात शिरोळ, करवीर आणि आजरा तालुक्यातील शालेय ग्रंथालयांना ते ग्रंथभेट देणार आहेत.
वाचनीय, दर्जेदार पुस्तक संचासोबत ग्रंथालय शास्त्राचे जनक डाॅ.एस.आर.रंगनाथन यांची आणि ग्रंथालयाची पंचसुत्रे यांच्या लॅमिनेटेड प्रतिमाही शालेय ग्रंथालयास प्राचार्य जीवन साळोखे हे देणार आहेत. यापूर्वी जिल्ह्यातील कागल, भुदरगड, गडहिंग्लज, राधानगरी, हातकणंगले, पन्हाळा या तालुक्यासह इचलकरंजी शहर व परिसरातील सुमारे तीनशेहून अधिक शालेय ग्रंथालयाना व सार्वजनिक वाचनालयांना प्राचार्य साळोखे यांनी वेळोवेळी पंधरा हजारांहून अधिक पुस्तके या उपक्रमांतर्गत वाचनससंस्कृती वाढण्यासाठी आजपर्यंत भेट दिली आहेत. राज्यसरकारच्या नवीन वर्षातील “वाचन संकल्प पंधरवडा ” या अभियानास पोषक असणाऱ्या या कृतीशील उपक्रमात सर्व हायस्कूल्सनी सक्रिय सहभागी व्हावे असे जीवन साळोखे यांनी आवाहन केले आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30