नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 9422425373 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शिक्षक, पदवीधर आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन – ज्ञानप्रबोधिनी

ज्ञानप्रबोधिनी

Latest Online Breaking News

शिक्षक, पदवीधर आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

शिक्षक, पदवीधर आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन

शिक्षकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहणार : आमदार जयंत आसगावकर

ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, मुंबई
शिक्षण क्षेत्रातील विविध मागण्यांसाठी शिक्षक, पदवीधर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन केले. मागण्याची पूर्तता करावी यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
टप्पा अनुदान शाळांना अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करावी, १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, संच मान्यतेचा जाचक जीआर रद्द करावा, समग्र शिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासह इतर मागण्यांसाठी आज (शुक्रवारी) शिक्षक व पदवीधर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलने केले.
या आंदोलनात आमदार जयंत आसगावकर, आमदार विक्रम काळे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किशोर दराडे, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर आडबाले, आमदार अभ्यंकर सहभागी झाले होते. जोपर्यंत शासन शिक्षकांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी सांगितले.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30