माजी मुख्याध्यापकांकडून श्री.बी.के.गोडाळ यांच्या अक्षरमित्र ग्रंथालय निर्मिती उपक्रमासाठी ७५ पुस्तकांची भेट
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
माजी मुख्याध्यापकांकडून श्री.बी.के.गोडाळ यांच्या अक्षरमित्र ग्रंथालय निर्मिती उपक्रमासाठी ७५ पुस्तकांची भेट
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, राजापूर
राजापूर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एस. के. गुर्जर यांच्याकडून जुवाठी माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक बी.के.गोडाळ यांच्या अक्षरमित्र ग्रंथालय निर्मिती उपक्रमासाठी ४ हजार ३११ रुपये किंमतीची ७५ पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी राजापूर हायस्कूलच्या माजी शिक्षिका सौ. विद्या गुर्जर, त्यांची कन्या सौ. अनघा रानडे तसेच सौ. मालती गोंडाळ उपस्थित होत्या. बी. के. गोंडाळ हे राजापूर हायस्कूलचे शैक्षणिक वर्ष १९८७ ते१९९१ मधील ८ वी ते १२ वीचे माजी विद्यार्थी. या काळात श्री.गुर्जर हे राजापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक होते. आपला माजी विद्यार्थी बी. के. गोंडाळ यांनी सुरु केलेल्या अक्षरमित्र ग्रंथालय निर्मिती उपक्रमाची दखल घेवून कौतुक केले व आपल्या शिक्षक कालावधीत संग्रही असलेली पुस्तके भेट दिली व गोंडाळ यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यापूर्वीही गुर्जर सरांनी या उपक्रमासाठी मार्च २०२० मध्ये ७६ पुस्तके भेट दिली होती.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
आणखी कथा
