स्व.साईनाथ मोरे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात रेहान नदाफ तर मोठ्या गटात अनुष्का जाधव प्रथम : ८४ स्पर्धकांचा सहभाग
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
स्व.साईनाथ मोरे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात रेहान नदाफ तर मोठ्या गटात अनुष्का जाधव प्रथम : ८४ स्पर्धकांचा सहभाग
ज्ञानप्रबोधिनी प्रतिनिधी, गारगोटी
स्वर्गीय साईनाथ सर्जेराव मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात रेहान शकील नदाफ (उजळाईवाडी) याने तर मोठ्या गटात अनुष्का रवींद्र जाधव (नरतवडे) हिने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत ८४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा सविस्तर निकाल खालील प्रमाणे – लहान गट : कु.रेहान शकील नदाफ (उजळाईवाडी) प्रथम क्रमांक, कु.प्राची अजित मोहिते (रेंदाळ) द्वितीय क्रमांक, कु.स्वराज्य सुनील वागवेकर (सरवडे) तृतीय क्रमांक तर कु.श्लोक विकास चौगुले (पंडेवाडी) व कु.साक्षी तानाजी पाटील (कासारवाडा) उत्तेजनार्थ
मोठा गट : कु.अनुष्का रवींद्र जाधव (नरतवडे) प्रथम क्रमांक, कु.श्रेया रणजीत रेडेकर (मानेवाडी) द्वितीय क्रमांक, कु.संचिता संदीप गोजारे (सरवडे) तृतीय क्रमांक तर कु.गौरी दीपक चौगुले (नरतवडे) व कु.ज्ञानेश्वरी सुभाष देसाई (कोळवण) उत्तेजनार्थ
स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती छाया आनंदराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर बक्षीस वितरण श्री.मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई (आप्पा), भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या शुभहस्ते तर सहाय्यक निबंधक श्री.संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी कर्मवीर हिरे कॉलेजचे प्राचार्य डॉ.उदयकुमार शिंदे, गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर, उपसरपंच प्रशांत भोई, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, कविवर्य सखाराम खोत, श्रीमती छाया आनंदराव मोरे, आर. वाय. देसाई, युवराज शिगावकर, माजी उपसरपंच सागर शिंदे यांच्यासह स्पर्धक त्यांचे मार्गदर्शक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी तर आभार एम. एस.मोरस्कर यांनी तर सूत्रसंचलन प्रा.अतुल कुंभार व अभिजीत पोवार यांनी केले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रकाश कडव, युवराज बिरंबोळे, गजानन नार्वेकर, सिद्धेश मिसाळ तसेच टाईम पंच म्हणून उदय मोरे व गुरुनाथ पाटील यांनी काम पाहिले.स्पर्धा संयोजन समिती सदस्य सर्जेराव मोरे. कॉ. सम्राट मोरे, अभिजीत पोवार, प्रा.अतुल कुंभार,अभिजीत शिंदे, बाजीराव मोरे, प्रतीक घाटगे, संदेश मोरे, बाळासाहेब देसाई, आर.के.पाटील, प्रकाश मोरे आदींनी योग्य नियोजन करून स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space
